esakal | दिलासादायक : जळकोटची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
sakal

बोलून बातमी शोधा

corona photo.jpg

आठ दिवसापासून एकही रुग्ण नाही, सात पाँझिटीव्ह आहेत तेही घरी घेत आहेत उपचार

दिलासादायक : जळकोटची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

sakal_logo
By
शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर) : तालूक्यात दोन महिन्यापूर्वी तालुक्यात कोरोनाबाधीतांचा आकडा चारशेवर गेला होता. पंरतू हळूहळू तो आटोक्यात येत गेला. तालुक्यात केवळ सात पाँझिटिव्ह रुग्ण असून तेही घरी उपचार घेत असून आठ दिवसात एकही कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याने जळकोट तालुक्याची कोरोनामुक्ती वाटचाल सुरु आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तालुक्यात सोळा आक्टोबर पर्यत ३८१ रुग्णांची नोंद झाली होती.त्यातील ३६२ जण उपचार घेऊन घरी परत गेले आहेत.आरोग्य विभागाने वेळोवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केल्याने तालुक्यात कोरोना आटोक्यात आला राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे,पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. जगदीश सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार यांनी वेळोवेळी बैठका घेऊन सुचना दिल्या होत्या. आरोग्य विभागाच्या टीमने गावोगावी जात कोरोनाबाबत जनजागृती केली. यामुळे कोरोनाचा तालुक्यातील २६ गावात शिरकाव झालेला नाही.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी तालुक्यातील ऎशी हजार नागरिकांची तपासणी करण्यासाठी सुचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली होती. दरम्यान जिल्हातील एकमेव कोविड सेंटर असेल ते रिकामे असेल. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


तालुक्यात कोरोनाची सध्याची स्थिती एकुण पाँझिटिव्ह ३८१ उपचार घेऊन घरी परतलेल्या रूग्णाची संख्या ३६२, आजपर्यत मृत्यूची संख्या अकरा, पाँझिटिव्हची संख्या आठ, घरी उपचार घेत असलेल्या रूग्णाची सात असून यातील एका रुग्णाला उपचारासाठी लातूर हलवले आहे. पुढील दिवसात दसरा दिवाळीचा सण येत असून नागरिकांनी खरेदीसाठी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे गरजेचे आपली स्वतःची काळजी स्वताच घेणे गरजेचे आहे.आरोग्य विभागाला सहकार्य करुन दोन्हीही सण उत्साहात साजरे करावे, असे आवाहन डॉ. जगदीश सुर्यवंशी यांनी केले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)