मराठवाड्यातील सरकारी कार्यालयांनीच थकविले २,१५१ कोटींचे वीज बील!  

प्रकाश बनकर
Friday, 6 November 2020

मराठवाडयात औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळातील सार्वजनिक पाणी पुरवठा, पथदिवे व सरकारी कार्यालयाकडे ४३,१३८ वीज ग्राहकांकडे २ हजार १५१.१७ कोटी रूपयांची थकबाकी आहे. 

औरंगाबाद : महावितरणला वीज विकत घेवून ग्राहकांना वीज पुरवठा करावा लागतो. विकलेल्या विजेचे पैसे वसूल होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. मराठवाडयातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळातील सार्वजनिक पाणी पुरवठा, पथदिवे व सरकारी कार्यालयाच्या ४३ हजार १३८ वीज ग्राहकांकडे २ हजार १५१.१७ कोटी रूपयांची थकबाकी आहे. कोरोनाच्या नियमाचे पालन करून वीज पुरवठा खंडित न करता आमदार, पालकमंत्री यांची मदत घेवून थकबाकी वसूल करण्यात येत आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणकडून कोणत्याही ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत नाही. वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी विनंती, सूचना, पत्रव्यवहार, वॉटसअपद्वारे एसएमएस संदेश उर्जामंत्री डॉ. नितीन राउत, व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता व सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविण्यात येत आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

औरंगाबाद परिमंडळातील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या ११ हजार ७१२ वीज ग्राहकांकडे ४३१.३२ कोटी रूपयांची थकबाकी आहे. लातूर परिमंडळातील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या १७ हजार ५१५ वीज ग्राहकांकडे १०५२.९९ कोटी रूपयांची थकबाकी आहे. नांदेड परिमंडलातील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या १३,९११ वीज ग्राहकांकडे ६६६.८६ कोटी रूपयांची थकबाकी आहे. असे मराठवाडयात औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळातील सार्वजनिक पाणी पुरवठा, पथदिवे व सरकारी कार्यालयाकडे ४३,१३८ वीज ग्राहकांकडे २ हजार १५१.१७ कोटी रूपयांची थकबाकी आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नगरपालिका, महानगरपालिका आणि शासकीय कार्यालय यांच्याकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्याला प्राधान्य घावे. तसेच वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी त्या भागातील आमदार - पालकमंत्री याची मदत घेण्याची सूचना उर्जामंत्री डॉ नितीन राउत यांनी केली आहे. 

परिमंडळ वीज ग्राहक थकबाकी कोटी रूपये 

  • औरंगाबाद ११,७१२ ४३१.३२ 
  • लातूर १७,५१५ १०५२.९९ 
  • नांदेड १३,९११ ६६६.८६ 
  • एकूण ४३,१३८ २,१५१.१७ 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government offices have exhausted electricity bills two thousand 151 crore marathwada news