एक गाव असंही; विकासासाठी उच्चशिक्षित तरुणांना केलं जातं बिनविरोध सरपंच

बाबासाहेब गोंटे
Monday, 28 December 2020

गावची स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यापासून गावातील गावगाडा चालविण्यासाठी गावचा सरपंच बनत आहे

अंबड (जि.जालना): अंबड तालुक्यातील दुधना नदीच्या काठावर वसलेलं चांभारवाडी हे एक छोटस 373 मतदार असलेलं गाव आहे. मागील अनेक वर्षे चांभारवाडी हे तीन गावच्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट होते. मात्र आता गावची स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यापासून गावातील गावगाडा चालविण्यासाठी गावचा सरपंच बनत आहे. गाव छोटं असलं तरी विकास कामाला चालना मिळावी यासाठी सर्वच ग्रामस्थ एकमुखी निर्णय घेतात ही खरोखर आनंदाची व समाधाची बाब आहे.

आपल्या गावातील विकास कामे पूर्ण व्हावी. यासाठी गावातील शिकलेल्या तसेच उच्चशिक्षित तरुणाला गावचा सरपंच बनविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला जात आहे.

आरं बाबा... सरपंच कोण होणार हाय? मत द्यायच कुणाला?

यापूर्वी दोन वेळेस ग्रामपंचायत केली बिनविरोध:
चांभारवाडी येथील ग्रामस्थांनी गावच्या विकास कामाला सतत गती मिळावी. यासाठी एकत्र येऊन तीन वेळेस ग्रामपंचायत बिनविरोध करून पहिल्या वेळेस एम. ए.अर्थशास्त्र झालेल्या निवृत्ती टेमकर या तरुणाला सलग दहा वर्षे काम करण्याची संधी दिली. तर तिसऱ्यांदा नाना कांबळे या शिकलेल्या तरुणाला पाच वर्षे सरपंचपदाची सुवर्ण संधी दिली.

Success Story: पाण्याअभावी ओसाड पडलेल्या जमिनीवर तीन एकरात सिताफळाचे सव्वातीन लाखांचे उत्पन्न

तालुक्यातील चांभारवाडी येथील ग्रामस्थांनी आता चौथ्यांदा ग्रामपंचायत निवडणूक बिविरोध पार पाडण्यासाठी एकमुखी निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी शिक्षित तसेच उच्चशिक्षित तरुणाला सरपंचपदाची संधी नेहमीच दिली. पण आता गावात एका आडनावाचे एकच घर असलेल्या व्यक्तीला ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य होता यावे. यासाठी अशाच व्यक्तींना या निवडणुकीत सुवर्ण संधी देण्यासाठी सात सदस्य बिनविरोध निवडुन देत सर्वांनी एकत्र येऊन गावात शांतता, सुरक्षितता बाळगताना गावची ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू केले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election high qualified youth sarapanch ambad