कुणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ? उद्या मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

jalkot gp election
jalkot gp election

जळकोट (जि.लातूर): तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या २०६ जागेसाठी उद्या (15) मतदान होत आहे. तहसीलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी यांच्या उपस्थित ई.व्ही.मशिन सह इतर सहित्य देऊन कर्मचाऱ्यांना तालुक्यातील मतदान बुथवर ता.चौदा रोजी दुपारी बारा वाजता रवानगी करण्यात आली आहे.

बोरगावखुर्द, धामणगाव, सुल्लाळी, गव्हाण, घोणसी, अतनुर, शिवाजीनगर तांडा, रावणकोळा, हाळदवाढवणा, वाजरवाडा, वडगाव,कुणकी,बेळसांगवी, लाळी बु,डोगरकोनाळी, सोनवळा, कोळनुर, पाटोदा खुर्द, एकुर्गा खुर्द, आदिसह २६ गावात २०६ जागेसाठी आज मतदान होणार असल्याने तहसिलच्या निवडणूक विभागातून मतदान केंद्रावरील मतपेटी व इतर साहित्य देऊन तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी श्रिफळ फोडून वाहनाला पाठविण्यात आले.

तालुक्यातील निवडणूक लागलेल्या गावात कोठे चौरंगी, तर कोठे तिरंगी, दोहरी लढती आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, विविध पक्षाचे अध्यक्ष यांची प्रतिष्ठा लागली आहे. प्रत्येक उमेदवारांनी कंबर कसून प्रचार शिंगेला पोहचवीला आहे.

बाहेर गावचे मतदान आणण्यासाठी अनेक उमेदवारांनी पैसाची मोठी उधळण केली आहे. तालुक्यातील मतदान केंद्रावर अनुसूचीत प्रकार घडू नये यासाठी एक उपविभागीय पोलिस अधिकारी, दोन पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक, एकशे चाळीस पोलिस कर्मचारी तैनात करण्यात  आल्याची  माहिती पोलिस निरीक्षक गणेश सोडारे यांनी दिली.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com