कळंब तालुक्यात सरपंच, उपसरपंचपदांच्या निवडीची उत्सुकता शिगेला 

दिलीप गंभीरे
Monday, 25 January 2021

आतापर्यंतच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच निवडणुका झाल्यानंतर सरपंचपदासाठीचे आरक्षण सोडत झाले. त्यामुळे निवडणूक काळात पॅनलचा खर्च कोणी करावा?

कळंब(जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. यात सहा ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने ५९ पैकी ५३ ग्रामपंचयतींच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसील कार्यालयात सामाजिक अंतराचा फज्जा उडवत पार पडला. त्यामुळे सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम केव्हा लागते, याकडे सर्वांचे डोळे लागले असून सदस्यांसह इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया,‘मी राजकीय भांडवल केले नसते’

आतापर्यंतच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच निवडणुका झाल्यानंतर सरपंचपदासाठीचे आरक्षण सोडत झाले. त्यामुळे निवडणूक काळात पॅनलचा खर्च कोणी करावा? यासाठी गावपातळीवरील नेत्याची चांगलीच कसरत झाली. या निवडणुकीत अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले. तर काहींना मतदारांनी गावगाडा सांभाळण्याचे मतदानातून बळ दिले. सरपंचपदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसील कार्यालयात सामाजिक अंतराचा फज्जा उडवत पार पडला.

औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!

कोरोना संसर्गाचे नियम सांगणाऱ्या संबधित प्रशासनाकडूनच नियम पायदळी तुडविल्याची चर्चा होती. आरक्षण सोडतीच्या वेळी तालुक्यातील बहुतांश लोक कोणत्या प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण सुटते हे पाहण्यासाठी तहसील कार्यालयात जमा झाले होते. तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्यातून ४९५ सदस्यांची निवड झाली आहे. मतदारांचा कौल मिळालेल्या नेत्यांनी पहिल्या टप्प्यातील यशानंतर आता सरपंच, उपसरपंचपदासाठी व्युहरचना सुरू केली आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

सरपंच, उपसरपंच निवडीची तारीख पक्की झाल्यानंतर सरपंच उपसरपंचपदाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर घालायचा याचे आखाडे बांधले जात आहेत. मतमोजणी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप पक्षाच्या स्थानिक तसेच तालुका पातळीवरील नेत्यांनी ग्रामपंचायती आपल्या पक्षाच्या ताब्यात असल्याचे दावे केले. त्यामुळे सत्ता संघर्षात सरपंच उपसरपंचपदाच्या निवडीला महत्त्व आहे.

ग्रामपंचायतींचे सदस्य सहलीवर
तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती काठावर पास झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांची धाकधूक वाढली आहे. संभाव्य धोका नको म्हणून आपले सदस्य सहलीवर पाठविले आहेत. एक ही सदस्य दुसऱ्या गटाच्या हाती लागू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे.
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Kalamb Appointment Of Sarpanchas Osmanabad News