प्रचाराचा आगळा - वेगळा फंडा! मकरसंक्रांतीनिमित्त निवडणूक चिन्हाच्या वस्तूंची वाणं भेट

अविनाश काळे
Tuesday, 12 January 2021

तालुक्यातील 49 पैकी अकरा ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात गाव पुढाऱ्यांना यश मिळाले

 

उमरगा (उस्मानाबाद): ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. 38 ग्रामपंचायतीसाठी शनिवारी (ता.15) होणाऱ्या मतदानाची तयारी प्रशासनाने केली असून उमेदवाराकडून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुक्यातील 49 पैकी अकरा ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात गाव पुढाऱ्यांना यश मिळाले.

त्यामध्ये तालुक्याच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र असलेली मुळजची ग्रामपंचायत बिनविरोध आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेली बलसूर ग्राम पंचायतही बिनविरोध आली. सध्या 38 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या रणधूमाळीत उमेदवारांना प्रचाराला वेळ कमी मिळालेला असला तरी वैयक्तित गाठीभेटी, पदयात्रेच्या माध्यमातुन मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.

RBI चा राज्यातील आणखी एका बँकेला दणका! परवाना रद्द केल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ

निवडणूकीत आमने - सामने उभे असलेले उमेदवार वार्डनिहाय मतदार याद्याचे निरीक्षण करुन कोण आपला, कोण परका याची चाचपणी करीत आहेत. दरम्यान यंदा परगावी रहाणाऱ्या मतदारांना बोलवण्याचे उमेदवारावरचे ओझे वेळ - अमावस्यामुळे बरेच हलके झाले आहे. मंगळवारी (ता.१२)   मतदार वेळ - अमावस्या असल्याने कांही मतदार गावाकडे आले आहेत, त्यांना आता तीन मुक्काम वाढविण्याची विनंती उमेदवाराकडून केली जातेय. काही करा पण मतदान करुन जावा, अशी विनंती केली जात आहे.

निमित्त हळदी - कुंकुवाचे-

मतदानाच्या आदल्या दिवशी गुरूवारी (ता. 14) महिला उत्सवाची पर्वणी असलेला मकरसंक्रांतीचा सण आहे. हळदी - कुंकुवाच्या निमित्ताने महिलांची भेट होते. भेटीत एखादी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. आता निवडणूकीच्या निमित्ताने महिला उमेदवारांना महिला मतदारांना भेटी बरोबरच प्रचाराची संधी मिळत आहे. ग्रामीण भागात नेहमी परिचयाचे असलेल्या कपबशी, किटली, जग, शिट्टी, बैलगाडी, इस्त्री, सिलेंडर आदी वस्तू निवडणूकीचे चिन्ह आहेत.

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा

काही उमेदवारांनी कमी खर्चातल्या वस्तू वाणं म्हणून भेट देण्याचे नियोजन केले आहे, त्याचा खर्च  हिशेबात लावता येतो, परंतू खर्च टाळण्यासाठी समर्थकांकडून
नियोजन होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी पतीराजाच्या प्रचारासाठी होम मिनिस्टर प्रचारात उतरले आहेत, हळदी - कुंकुवाच्या निमित्ताने महिला मतदारांशी त्या संपर्कात येत आहेत.

दरम्यान गेल्या आठ दिवसापासुन महिला उमेदवाराकडून प्रचार सुरु आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने  कुठल्याही स्वरूपाचे वाणं भेट देण्यापेक्षा मतदानरूपी वाणाची भेट आवश्यक देऊन येणाऱ्या पाच वर्षात सेवा करण्याची संधी देण्याची मागणी महिला उमेदवाराकडून केली जातेय.

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election umarga political news usmanabad