खर्च आणि उत्पन्नाचे समीकरण द्राक्ष उत्पादकांचे जुळेना, संकट लागले पाठीशी

Graps
Graps

अंबड (जि.जालना) : अनेक तरुण युवक शेती उद्योग व्यवसायत आता आपले मन रमवीत शेती आधुनिक व तंत्रज्ञान पद्धतीने करत आहे. त्यातच उत्पन्नाचे भरघोष स्वप्न मनात बाळगत शेतीत आगळी-वेगळी कल्पना करत आहे. मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांची द्राक्ष फळबाग लागवड करुन मोठे उत्पन्न मिळविण्यासाठी दिवसरात्र धडपड सुरु आहे. गोलापांगरीसह परिसरातील अनेकांना द्राक्ष फळबाग लागवडीतून खरी प्रेरणा मिळाली आहे. यामुळे बठाण गोला, गोलापांगरी, काजळा, आलमगावसह आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात द्राक्ष फळबागेची लागवड झालेली दिसुन येत आहे.

द्राक्ष फळबागेला बसला कोरोनाचा फटका
अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष फळबागा फुलविल्या होत्या. मात्र जागतिक कोरोना महामारीचे संकट उद्भवल्याने बाजारपेठा बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. द्राक्ष उत्पादकांना जाग्यावर ४० ते ४५ रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या भावात प्रचंड घसरण होऊन अखेर पाच ते दहा रुपये किलोप्रमाणे विक्री करावा लागला. तर अनेकांनी द्राक्ष फुकट वाटप केले.


अजून द्राक्ष उत्पादक उत्पन्नाची आशा जागा
अनेक सुलतांनी संकट, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, सततचा पाऊस यामुळे झालेले नुकसान सोसवत अजून ही द्राक्ष फळबागेतून भरघोष उत्पन्न मिळेल अशी आशा बाळगुन आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी फळबागेवर केलेला खर्चही आतापर्यंत वसुल न झाल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे आॅक्टोबरमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के केलेली छाटणी अखेर वाया गेली. उर्वरित काही ठिकाणी कमी प्रमाणात डोळे फुगवण झाली आणि त्यातुन दहा ते वीस असे घड दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्येक द्राक्ष शेतकरी अडचणीत आहे. काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागा जगविण्यासाठी उधार उसणवारी केली. फळबागासाठी उधारीवर घेतलेले खते, औषधीचे पैसे वसुल झाले नाही.


गत वर्षाच्या तुलनेत या वर्षी लवकर नियोजन केले होते. परंतु या वर्षी जास्त प्रमाणात झाडांना पाणी पुरवठा झाल्यामुळे बागांना मोजकेच दहा ते वीस घडापेक्षा जास्त घड लगडलेले नाही. यामुळे उत्पन्नाची आशा मावळली आहे.
- अरविंद मोरे, द्राक्ष उत्पादक, शेतकरी, गोलापांगरी

द्राक्ष फळबागेची सलग तीन वर्षापासुन जोपासना करत आहे. द्राक्ष बागेवर मोठया प्रमाणात खर्च केला. पण कोरोनामुळे अखेर  होत्याचे नव्हते झाले.
- कृष्णा उजाड, द्राक्ष उत्पादक, बठाण बु.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com