esakal | निरोगी आरोग्याची गुढी उभारूया, कशी? ते वाचलेच पाहिजे
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

काळासोबतच समाजजीवन झपाट्याने बदलत असल्याने असंख्य समस्या आज भेडसावत आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मंगल दिनी  ‘हे निसर्गाने लादलेले संकट आहे, की प्रशासनाच्या चुकीचे फळ आहे’ याचे कारण शोधण्याची वेळ आली आहे.

निरोगी आरोग्याची गुढी उभारूया, कशी? ते वाचलेच पाहिजे

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : गुढीपाडवा हा वर्षारंभाचा पहिला हिंदू सण. पाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक. या दिवशी कोणतेही नवी कामे करण्यास प्रारंभ केला जातो. चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. या दिवशी गुढी उभारून नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो; परंतु महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव न भुतो न भविष्यती असा झाला आहे. त्यामुळे या प्रादुर्भावाला पिटाळून लावून, या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी आजच्या दिवशी सर्वांनीच संकल्पाची गुढी उभारण्याची गरज आहे.

हेही वाचा - पाणीटंचाईच्या खर्चासाठी मराठवाड्याला पावणे चार कोटी

वाढते प्रदूषण आणि पर्यावरणीय चिंता
परंपरेनुसार बुधवारी (ता. २५ मार्च २०२०) गुढीपाडवा साजरा होतो आहे. या सणाला सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे. हा सण निसर्गाशी नाते सांगणारा आहे. ऋतुबदलाचे स्वागत करणारा हा उत्सव आहे. त्याला पर्यावरणीय संबंधही आहे. आज वाढत्या प्रदूषणाच्या काळात पर्यावरणीय चिंता सर्वांनाच भेडसावते आहे. शिवाय कोरोनाच्या सावटातून बाहेर पडण्यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने संकल्प करूया. निसर्ग अबाधित राखण्याचे व्रत आपण सर्वांनीच स्वीकारले, तर या सणाला नवे औचित्य व अर्थ प्राप्त होईल.

हे देखील बघा - Video : परभणी महापालिकेतर्फे शहर निर्जंतूकीकरणाचे काम सुरु

पाणीटंचाईच्या झळाही सोसाव्या लागतात
आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्हे पाण्यावाचून तहानलेले आहेत. जेथे कोठे थोडासा पाण्याचा साठा आहे तेथे पोलिसांचा कडा पहारा लावण्यात येतो. पाण्यासाठी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहतो. उन्हाळ्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यात पाणीप्रश्न बिकट अवस्थेत पोचलेला असतो. काही ठिकाणी तर टॅंकरचे पाणी मिळविण्यासाठी एक किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या असतात. जवळपास सर्व रस्त्यांवर पुरुष सायकल व अन्य वाहनांवर तर महिला व लहान मुले दूरदूरवरून पिण्याचे पाणी वाहून नेत असल्याचे चित्र उन्हाळ्यात दिसते. 

येथे क्लिक करा - धक्कादायक : इकडे पोलिस आहेत, उद्या फोन करतो म्हणाल्या अन्...

अशी उभारावी गुढी
सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगाला सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दारासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलाची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी, अशा रीतीने तयार केलेली गुढी दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडुनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, मथ, मीठ व ओवा इत्यादी घालून मिश्रण करावे. घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून हा दिवस आनंदात घालवावा. चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.

loading image