अहो काय सांगता..गुरुजींच्या हाती आता सरपंचपदाचीही धुरा !

दुर्गादास रणनवरे 
Friday, 14 August 2020

 परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर केंद्रप्रमुखांसह 
 कृषी अधिकारी आदींची प्रशासक म्हणून नियुक्ती 
 

औरंगाबाद : हो हो.. तुम्ही एकताय आणि वाचताय ते शंभर टक्के बरोबरच आहे . परभणी जिल्ह्यातील मुदत संपलेल्या विविध ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदाचा कारभार आता गुरुजी (केंद्र प्रमुख) , कृषी अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी,शाखा अभियंता हे आता ग्रामपंचायंतीच्या दैनंदिन कारभारामध्ये सरपंचपदाची धुरा सांभाळणार आहेत.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

याविषयी परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवारी (ता. १३) तसे आदेशच  जारी केले असून तात्काळ संबंधित अधिकार्यांनी नेमून दिलेल्या गांवातील ग्रामपंचायतींचा पदभार स्वीकारावा असे आदेशित केले आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा   

राज्यातील  मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर  जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने तसेच उच्च न्यायालय मुंबई यांच्या 22 जुलैच्या  निर्णयानुसार प्रशासक नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासनाने प्रदान केले आहे. प्राप्त  करून  मुदत संपलेल्या सदर ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध खात्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.  तसेच प्रशासक म्हणून पदभार दिलेल्या ग्रामपंचायतीचा पदभार तात्काळ स्वीकारून ग्रामपंचायतीचे काम करावे असे या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.  

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश
प्रशासक पदाबरोबरच मूळ पदाचेही काम
नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीच्या  प्रशासक पदाचे कामकाज करताना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागातील मूळ पदाचे कामकाज देखील
 सांभाळावे  लागेल  असे या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. परभणी तालुक्यातील  आर्वी, भोगाव, ब्रह्मपुरी, किनोळा, लोहगाव, नांदगाव आदींसह अन्य तालुक्यातील अनेक गावातील मुदत संपलेल्या  ग्रामपंचायतीचे पदभार विविध संवर्गातील अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत प्रशासन यांनी पदभार स्वीकारून त्यांची जबाबदारी व कर्तव्ययाचे पालन करावे असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड  

सरपंचाना असलेले अधिकार मिळणार पण मतदानाचा अधिकार नाही 
संबंधित ग्रामपंचायतीच्या प्रशासकांना ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये मतदानाचा कसलाही अधिकार असणार नाही.  असेही या देशांमध्ये स्पष्ट करण्यात  प्रशासकांना ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 38 नुसार जे अधिकार व कर्तव्य  सरपंच व ग्रामपंचायतीस  प्राप्त होतात ते सर्व अधिकार व कर्तव्य प्रशासक म्हणून प्राप्त राहतील.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

 सदरच्या प्रशासन पदाचा कारभार ग्रामपंचायतीच्या मुदत समाप्ती च्या दिनांकाच्या सलग  पुढील दिनांकापासून तात्काळ अमलात येतील. ग्रामपंचायत प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला बाबतचा अहवाल तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावे  असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guruji now holds post Sarpanch