IMP NEWS : मराठवाड्यात शाळा सुरु न करण्याचा मुख्याध्यापक संघाचा निर्णय 

सुहास सदाव्रते
Tuesday, 30 June 2020

दिवसेंदिवस कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहे, अशी परिस्थिती असताना मराठवाड्यातील शाळा एक जुलैपासून सुरू न करण्याचा निर्णय मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत मंगळवारी ( ता. ३०) घेण्यात आला आहे. मराठवाडा मुख्याध्यापक संघाची बैठक मंगळवारी ऑनलाइन घेण्यात आली. 

जालना : दिवसेंदिवस कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहे, अशी परिस्थिती असताना मराठवाड्यातील शाळा एक जुलैपासून सुरू न करण्याचा निर्णय मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत मंगळवारी ( ता. ३०) घेण्यात आला आहे. मराठवाडा मुख्याध्यापक संघाची बैठक मंगळवारी ऑनलाइन घेण्यात आली.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 
मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष युनूस पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक सकाळी दहा वाजता पार पडली. मराठवाडा मुख्याध्यापक संघाच्या बैठकीस औरंगाबाद, नांदेड, लातूर ,उस्मानाबाद, बीड परभणी व जालना जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. 
जालना जिल्ह्यातून जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य के. बी. लहाने, प्राचार्य मोरे, मुख्याध्यापक भगवान परिहार, मुख्याध्यापक सचिन देशमुख यांची उपस्थिती होती. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

बैठकीत हे झाले निर्णय

  • ता.१ जुलै २०२० पासून मराठवाड्यात कोणत्याही शाळा सुरू होणार नाहीत. असे निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक व जिल्हाधिकारी यांना देण्यात यावे.
  • सन २०१९-२० शैक्षणिक वर्षाचे वेतनेत्तर अनुदान मिळण्यासाठी मुख्याध्यापक संघाने प्रयत्न करणे.
  • शिक्षण उपसंचालक कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी जिल्ह्यातील प्रलंबित कामाची यादी मराठवाडा मुख्याध्यापक संघाला सादर करणे.
  • विभागीय  शिक्षण मंडळाकडे  प्रलंबित कामे, मंडळ मान्यता मध्ये मराठवाड्यात एक वाक्यता आणणे.
  • शिक्षकाच्या निवडश्रेणी संदर्भात प्रशिक्षणा संदर्भात शासनस्तरावर निर्णय निर्गमित होण्यासाठी प्रयत्न करणे.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक खांडके, सहाय्यक शिक्षण उपसंचालक एम. के. देशमुख ,लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक सोनुने यांच्यासह मराठवाड्यातील मुख्याध्यापक संघाचे  पदाधिकारी सहभागी होते.

 

आज मराठवाड्यातील मुख्याध्यापक संघाची ऑनलाइन बैठक पार पडली. सध्याची परिस्थिती पाहत व विद्यार्थी आरोग्यबाबत विशेष दक्षता व खबरदारी घ्यावी लागणार आहे. यामुळे एक जुलैपासून मराठवाडा शाळा सुरु न ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. 
श्रीकांत लहाने , जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ जालना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Headmaster Association decision not to start school in Marathwada