लातूर जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना : आई मी पास झाले ग...पण निकाल सांगू तरी कोणाला..

विवेक पोतदार
Wednesday, 29 July 2020

निकालाच्या आदल्या दिवशीच आईने जगाचा निरोप घेतला. लेकीने मोठ्या कष्टाने दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के मिळविले. आज निकाल लागला पण बाप नाही. आणि आई देखील गेली. हा आनंदाचा सोहळा कोणाला सांगू अशी विनवणी तिने देवाघरी गेलेल्या आईला केली. ही ह्र्दय पिळवटून टाकणारी घटना घडली. लातूर जिल्हातील जळकोट तालुक्यातील होकर्णा गावात. 

जळकोट :  आई....मी तुला अगोदर बोलल्याप्रमाणे दहावीला ९३.२० टक्के घेतले ग...पण माझा निकाल ऎकायला राहिली नाहीस...हा निकाल आता कोणाला सांगू? अशी आर्त किंकाळी ऎकुन सर्वांचे ह्रदय पिळवटून निघाले. कौतुक, शाबासकीची पाठीवर थाप मारायला घरी आई-वडीलच नसल्याने सांत्वन करताना कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

होकर्णा (ता.जळकोट) येथील रेणुका दिलीप गुंडरे या विद्यार्थ्यीनीच्या आयुष्यातील ही घटना आहे. रेणूकाचे प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण हे वंजारवाडा (ता. जळकोट) येथील श्री. संत गोविंद स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घेत होती. अतिशय गरीबी, हलाखीची परिस्थितीत मोठ्या जिद्दीने ती शिकत होती. ती हुशार असल्याने सर्व शिक्षकांचे लक्ष होते. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

आठ वर्षांपूर्वी वडीलांचे निधन झाले होते. आई आणि तीन बहिणी असे कुटुंब. गरीबीत आईच कुटुंबाचा गाडा ओढत होती. तिला आपल्या परीने तिघी बहिणी मदत करत असत. मजुरी करत मुलींना शिकवणारी आई. रेणूकाचा आईवर जीव होता. सकाळी उठून आईचा चेहरा पाहून सर्वजणी अभ्यासाला लागत. परंतु नियतीला हे ही पाहवले नाही. गरीबी, कष्टातून शिक्षण घेणार्या बहिणींची आई देवाने हिरावून नेली.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

आई...दहावीला चांगले मार्क घेऊन पास होणार. तुझे कष्ट वाया जाऊ देणार नाही. तुझे स्पप्न पूर्ण करणार ...! असे रेणूकाने अगोदरच सांगितलेले. पण दुर्देवाने निकालाच्या पहिल्या दिवशीच मंगळवारी (ता.२८) सर्पदंशाने तिच्या आईने जगाचा निरोप घेतला. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. गावावरही शोककळा पसरली. तर दहावीचा निकाल बुधवारी (ता.२९) लागला. मैत्रिणींनी रेणूकाचा निकाल पाहिला तर तिला ९३.२० टक्के गुण घेऊन ती गुणवंत ठरली. ती आता मोठ्या दु:खात असून तिला निकालापेक्षा आईचे जाणे काळजाला धक्का देणारे ठरले आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

'आई...मी पास झाले ग....पण निकाल कोणाला सांगू...?' तू माझा निकाल ऎकायला राहिली नाहीस... ही आर्त किंकाळी सर्वांचे ह्रदय पिळवटून टाकत आहे. तिचे अभिनंदन करावे का सांत्वन? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. उज्ज्वल यशाला दु:खाची किनार लागली असून आई-वडिल नाहीत, घरात वडिलधारी कोणी नाही. गरीबी, हलाखीची परिस्थितीत तिच्यासह बहिणींना शिक्षणासाठी समाजातील मदत करणारे संवेदनशील हात पुढे येणे गरजेचे आहे. तिचे अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. खूप गुणवत्ता आहे. परंतु आर्थिक आधार मात्र राहिला नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

संपादन-प्रताप अवचार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heartbreaking Yesterday mother passed away and today she get ssc result