esakal | जालना जिल्ह्यात श्रावणसरी कोसळल्या; चार मंडळात अतिवृष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

jalna paus.jpg

जालना शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता.२१) पहाटे श्रावणाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. परिणामी चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी मंडळात ८० मिलिमीटर, जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद मंडळात ६८ मिलिमीटर, टेंभूर्णी मंडळात ८० मिलिमीटर तर अंबड तालुक्यात अंबड मंडळात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जालना जिल्ह्यात श्रावणसरी कोसळल्या; चार मंडळात अतिवृष्टी

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता.२१) पहाटे श्रावणाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. परिणामी चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी मंडळात ८० मिलिमीटर, जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद मंडळात ६८ मिलिमीटर, टेंभूर्णी मंडळात ८० मिलिमीटर तर अंबड तालुक्यात अंबड मंडळात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता.२१) सकाळीपर्यंत मागील चोविस तासांमध्ये जिल्ह्यात  ३०.०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    
जिल्ह्यासह जालना शहरात मंगळवारी (ता.२१) पावसाने हजेरील लावली. शहरात पहाटे साडेपाच वाजल्यापासून पावसाला सुरवात झाली होती. सकाळी आठ वाजेपर्यंत मध्यम पावसाच्या सरी कोसळत होत्या. तसेच जिल्ह्यात सर्वदुर पावसाने हजेरी लावल्याची नोंद झाली आहे. परिणामी मंगळवारी (ता.२१) सकाळपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये झालेल्या पावसामूळे बदनापूर तालुक्यातील बावणेपांगरी मंडळात ८० मिलिमीटर, जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी मंडळात ८० मिलिमीटर, जाफराबाद मंडळात ६८ मिलिमीटर तर अंबड तालुक्यातील अंबड मंडळात ७६ मिलिमीटर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

तर जालना तालुक्यातील जालना मंडळात ४० मिलिमीटर, जालना ग्रामीण मंडळात ४२ मिलिमीटर, वाघ्रुळ मंडळात ५० मिलिमीटर, बदनापूर तालुक्यातील बदनापूर मंडळात ४३ मिलिमीटर, भोकरदन तालुक्यातील राजूर मंडळात ४९ मिलिमीटर, केदारखेडा मंडळात ४७ मिलिमीटर, पिंपळगाव रेणुकाई मंडळात ४० मिलिमीटर, परतूर तालुक्यातील आष्टी मंडळात ५० मिलिमीटर, अंबड तालुक्यातील धनगरपिंपरी मंडळात ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

दरम्यान जालना तालुक्यात २८.७५ तर आतापर्यंत ३९७.६५ मिलिमीटर, बदनापूर तालुक्यात ३१.८० तर आतापर्यंत ५०७.६० मिलिमीटर, भोकरदन तालुक्यात ३२.१३ तर आतापर्यंत ४२९.०९ मिलिमीटर, जाफराबाद तालुक्यात ४६.६० तर आतापर्यंत ३७५.२० मिलिमीटर, परतूर तालुक्यात ३१.४० तर आतापर्यंत ३२१.२० मिलिमीटर, मंठा तालुक्यात १५.५० तर आतापर्यंत ३४३.५० मिलिमीटर, अंबड तालुक्यात ३०.४३ तर आतापर्यंत ५२० मिलिमीटर तर घनसावंगी तालुक्यात २३.७१ तर आतापर्यंत ३८१.३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ता. एक जून ते आतापर्यंत ३७९.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!                                                                                                  
४९ पैकी एकच मंडळ राहिले कोरडे
जिल्ह्यात एकूण ४९ मंडळे आहेत. मंगळवारी (ता.२१) सकाळपर्यंत मागील चोविस तासांमध्ये जिल्ह्यातील ४८ मंडळात पावसाची नोंद झाली आहे. मात्र, जालना तालुक्यातील रामनगर या एकाच मंडळला पावसाने हुलकावणी दिल्याने हे मंडळ कोरडे राहिले आहे. 

(संपादन : प्रताप अवचार)