जालन्यात पावसाची जोरदार बॅटींग, या चार मंडळात अतिवृष्टी

महेश गायकवाड
Tuesday, 16 June 2020

यंदाच्या खरीप हंगामाची सुरूवात शेतकऱ्यांना सुखावणारी होत आहे. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्‍वरूपाचा पाऊस पडत असताना सोमवारी (ता.१५) अंबड, भोकरदन व जाफराबाद तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात भोकरदन, गोंदी, टेंभूर्णी व वडीगोद्री या चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता.१६) सकाळ पर्यंत जिल्ह्यात २०.८ मिलीमिटर पाऊस झाला आहे.

जालना : यंदाच्या खरीप हंगामाची सुरूवात शेतकऱ्यांना सुखावणारी होत आहे. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्‍वरूपाचा पाऊस पडत असताना सोमवारी (ता.१५) अंबड, भोकरदन व जाफराबाद तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात भोकरदन, गोंदी, टेंभूर्णी व वडीगोद्री या चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता.१६) सकाळ पर्यंत जिल्ह्यात २०.८ मिलीमिटर पाऊस झाला आहे.

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

हवामान खात्याने यंदा वार्षिक सरासरी एवढा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार सध्या मान्सूनची सुरुवात आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात लगबग करून केलेली खरीप पिकाची लागवड केली. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने कमी अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे लागवड यशस्वी झाली असून काही ठिकाणी पिकांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

मागील चोवीस तासात जिल्हयात २०.८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून यात अंबड तालुक्यातील गोंदी, वडीगोद्री मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी मंडळातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या चारही मंडळात ६५ मिलीमीटरहुन अधिक पाऊस पडला आहे.

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

मंगळवारी सकाळ पर्यंत झालेल्या पावसामध्ये जालना तालुक्यात ८ मिली मिटर, बदनापूर तालुक्यात १९, भोकरदनमध्ये २७.३८, जाफराबाद तालुक्यात ६७.६०, परतुर तालुक्यात ५.८० , मंठा तालुक्यात ६, अंबड तालुक्यात३०.८६ तर घनसावंगी तालुक्यात ७ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षीक सरासरी ६६३ मिली मिटर असून जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत १२३.५२ मिलीमिटर पाऊस झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Jalna heavy rains four circles