esakal | CORONA UPDATE : हिंगोलीत पुन्हा मुंबई कनेक्शन; रशिया येथून परतलेल्या तरुणासह सहा जणांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

download.jpg

जिल्ह्यात ४७६० व्यक्तींना भरती करण्यात आले असून, त्यापैकी ४२६४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४२३१ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीला ५२८ व्यक्ती भरती असून २५७ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

CORONA UPDATE : हिंगोलीत पुन्हा मुंबई कनेक्शन; रशिया येथून परतलेल्या तरुणासह सहा जणांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : बुधवारी ता.१ रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार एक २३ वर्षीय तरुण रशिया वरून पिंपळ खुटा येथे आला असून, त्यासह इतर पाच जण मुंबई, परभणी वरून हिंगोलीत दाखल झाले. या सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

वसमत येथील एका चाळीस वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तो व्यक्ती परभणी येथे शिक्षक असल्याने (ता.२५) परभणी येथे जाऊन आला. त्यानंतर (ता.२७) रोजी त्याच्या आई सोबत नांदेड येथील खाजगी रुग्णालयात जाऊन आला. त्यास ताप, सर्दी, खोकला आल्यामुळे त्याचा स्वॉब तपासण्यासाठी पाठविला. त्यानंतर शहरातील लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटर येथे भरती असलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

यामध्ये रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला तरुण हा पिंपळखुटा येथील रहिवासी आहे. तर दुसरा मुंबई येथून प्रगती नगर येथे परतला आहे. तसेच एक जण मुंबई येथून भांडेगाव येथे परतला आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

याशिवाय औंढा येथील क्वारंटाइन सेंटर येथून एका चार वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. सदरील बालक हा भोसी गावातील रहिवासी आहे. आणि तो भरती असलेल्या दोन कोविड रुग्णांसोबत एका गाडीने मुंबई येथून गावी परतला आहे. आजघडीला एकूण सहा रुग्णाला कोरोना बाधा झाली आहे.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

जिल्ह्यात कोरोनाचे २७६ रुग्ण झाले असून त्यापैकी२३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण ३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तसेच वसमत येथे तीन रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर कळमनुरी येथे१५ रुग्णावर उपचार सुरू आहेत.तर डेडीकेटेट हेल्थ सेंटर येथे दोन रुग्ण आहेत. शिवाय लिंबाळा येथे दहा रुग्ण भरती असून उपचार सुरु आहेत. तर सेनगाव येथे पाच व औंढा येथे तीन रुग्ण भरती आहेत.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

जिल्ह्यात ४७६० व्यक्तींना भरती करण्यात आले असून, त्यापैकी ४२६४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४२३१ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीला ५२८ व्यक्ती भरती असून २५७ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

loading image