हिंगोलीत पाच रुग्णांनी हरविले कोरोनाला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे या पाच जणांना गुरुवारी घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ९६ झाली आहे. दरम्यान, वसमत तालुक्यातील आखणी एका ४२ वर्षीय संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

हिंगोली : वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारघेत असलेल्या पाच कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल गुरुवारी (ता. २८) निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे घरी सोडलेल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६ झाली आहे. दरम्यान, मुंबईहून परतलेल्या आणखी एका ४२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल गुरुवारी (ता. २८) आला.

वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे या पाच जणांना गुरुवारी घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ९६ झाली आहे. दरम्यान, वसमत तालुक्यातील आखणी एका ४२ वर्षीय संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

हेही वाचाहिंगोलीत हळद अडीच हजारांनी उतरली

दहा रुग्णांवर उपचार सुरू

त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६६ झाली आहे. जिल्ह्यातील कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आठ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. सेनगाव येथील १२, हिंगोली २९, वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये ११ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात दहा कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यात औंढा चार, भिरडा एक, सूरजखेडा एक, समूदाय आरोग्य अधिकारी एक, पहेणी दोन, माझोड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून इतर कोणतेही आजार नाहीत.

२३३ संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित

जिल्हाभरात आतापर्यंत दोन हजार ११० रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी एक हजार ७१० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यातील एक हजार ६९१ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ४१२ संशयित भरती असून यातील २३३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

येथे क्लिक करासंतापजनक : क्वारंटाइन गरोदर मातेसह मजुरांना मारहाण

अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडणे टाळावे

मुंबईसारख्या मोठ्या शहरांत कामानिमित्त गेलेले नागरिक आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परत येत आहेत. यात मुंबईहून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असून त्यातील कोरोनाबाधित रुग्ण निघत आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.

जवळा खुर्द येथे सॅनिटायझरचे वाटप

हयातनगर : वसमत तालुक्यातील जवळा खुर्द येथे बुधवारी (ता. २७) आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते ग्रामस्थांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच सारिका डाढाळे, तान्हाजीराव बेंडे पाटील, बालू ढोरे, श्री. कदम, योगाजी बोंढारे, सुदाम डाढाळे, भगवान जवळेकर, सखाराम डाढाळे, गजानन डाढाळे, साहेबराव डाढाळे, बापूराव गरड, पोलिस पाटील बाबाराव लोहट, श्री. खिलारे, मुख्याध्यापक श्री. ठोके, श्री. गोरे, श्री. लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य माधव पवार, रेखाबाई खरे आदींची उपस्‍थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Hingoli, Five Patients Lost to Corona Hingoli News