Hingoli Lok Sabha Election 2024 : संकटमोचक महाजनांची शिष्टाई यशस्वी! हिंगोलीत भाजपाच्या रामदास पाटलांचे बंड थंड

Lok Sabha Election 2024 : हिंगोली लोकसभेची जागा महायुतीमधून शिंदेसेनेला सोडण्यात आली आहे.
Hingoli Lok Sabha Election 2024  BJP Ramdas Patil has withdrawn his candidature girish mahajan Politics News
Hingoli Lok Sabha Election 2024 BJP Ramdas Patil has withdrawn his candidature girish mahajan Politics News

हिंगोली, ता. ८ लोकसभा मतदार संघातून भाजपाचे रामदास पाटील यांचे बंड अखेर थंड झाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे त्यांनी सोमवारी (ता.८) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांचा प्रचार करण्याची घोषणा केली. त्यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला प्रचार करण्याची घोषणा केली. त्यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.

हिंगोली लोकसभेची जागा महायुतीमधून शिंदेसेनेला सोडण्यात आली आहे. त्यानुसार या ठिकाणी शिंदेसेनेने बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण याच लोकसभा मतदार संघातून मागील तीन वर्षांपासून मतदारांशी संपर्क साधून असलेल्या भाजपाचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ योगी शाम भारती महाराज व माजी जिल्हाध्यक्ष अँड. शिवाजी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Hingoli Lok Sabha Election 2024  BJP Ramdas Patil has withdrawn his candidature girish mahajan Politics News
Jalgaon Lok Sabha Election : अमळनेरला युती, आघाडीत राजकीय शांतता! मतदार संघात युती, आघाडीचा अजून एकही मेळावा नाही

हिंगोली लोकसभा मतदार संघात रामदास पाटील यांचा जनसंपर्क लक्षात घेता त्यांची बंडखोरी महायुतीला जड जाणार असल्याचे चित्र दिसू लागले होते. तर पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीचा प्रचार देखील सुरु केला होता. मात्र मत विभाजनात महायुतीला फटका.बसेल या भीतीने पाटील यांची उमेदवारी मागे होणे गरजेचे बनले होते.

त्यामुळे भाजपाचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांनी रविवारी ता. सात हिंगोली येथे पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, आमदार श्रीकांत भरतीया, तान्हाजी मुटकुळे यांनी मध्यस्थी केली. गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही असे आश्वासन दिले. त्यानंतर सोमवारी निर्णय घेण्याचे पाटील यांनी सांगितले. त्यानुसार भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर पाटील यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Hingoli Lok Sabha Election 2024  BJP Ramdas Patil has withdrawn his candidature girish mahajan Politics News
Lok Sabha 2024: तब्बल दहा वर्षांनंतर PM मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचाराचं फुंकणार रणशिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com