एकात्मतेसाठी धावले हिंगोलीकर

marethon
marethon

हिंगोली : येथील पोलिस दलातर्फे एकात्‍मता संदेशासाठी रविवारी (ता. २३) सकाळी साडेसहा वाजता पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत मोठ्या संख्येंने धावपटू सहभागी झाले होते. यामध्ये महिला गटातून अंकिता गव्हाणे; तर पुरुष गटातून हनुमान कन्हेरकर यांनी बाजी मारली.  

येथील जिल्‍हा पोलिस दलातर्फे एकात्‍ममा संदेशासाठी रविवारी सकाळी मॅरथॉन स्‍पर्धा घेण्यात आली. या वेळी आमदार तान्हाजी मुटमुळे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी ए. जी. खान, रामेश्वर वैजणे, पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, श्री. सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आदींची उपस्‍थिती होती. सकाळी सहा वाजताच संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर स्पर्धेक जमा झाले होते.

स्‍पर्धा संपल्यानंतर अत्‍पोहाराचे वाटप

सकाळी साडेसहा वाजता संत नामदेव पोलिस कवायत मैदानावरून या स्‍पर्धेला सुरवात झाली. ही मॅरेथॉन इंदिरा गांधी चौक, अग्रसेन चौक, बिरसामुंडा चौक मार्गे जुने जिल्‍हा परिषद परिसरातील पाण्याच्या टाकीपर्यंत काढण्यात आली. पुन्हा येथून अग्रसेन चौक मार्गे इंदिरा गांधी चौकातून संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर स्पर्धेचा समारोप झाला. स्‍पर्धेत सहभागी झालेल्या स्‍पर्धेकांसाठी अग्रसेन चौक, बिरसामुंडा चौकात पाणी व एनर्जी ड्रिंक्‍सची व्यवस्‍था करण्यात आली होती. तसेच स्‍पर्धा संपल्यानंतर अत्‍पोहारही देण्यात आला. त्यानंतर स्‍वरगंधारतर्फे संगीत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, पोलिस विभागातर्फे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे. 

विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

या वेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत महिला गटातून अंकिता गव्हाणे प्रथम, चंदा मुंढे द्वितीय, पूजा भिसे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच भक्‍ती चव्हाण, ॲड. अश्विनी शहा यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. पुरुष गटातून ओम कन्हेरकर प्रथम, ओम पोले द्वितीय; तर अमीश चव्हाण यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. कैलास चव्हाण यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. विजेत्या स्पर्धेकांना मान्यवरांच्या उपस्‍थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. 

अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एची पी. तुम्मोड, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी ए. जी. खान, रामेश्वर वैजणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, विभागीय वनअधिकारी केशव वाबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com