esakal | घंटा न वाजताच शाळा झाली सुरु! पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

घंटा न वाजताच शाळा झाली सुरु

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके वाटप करण्यात आले.

घंटा न वाजताच शाळा झाली सुरु

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. १५) शाळा (School) सुरु झाल्या. शिक्षण संचालक पुणे आणि शिक्षणाधिकारी यांच्या लेखी आदेशानुसार शाळेची घंटा न वाजता केवळ शाळेत शिक्षकांचे आदेश असल्याने शिक्षक उपस्थित होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके वाटप (home delivery books distributed) करण्यात आले. (home delivery books were distributed to students on the first day of school in hingoli district)

हेही वाचा: महावितरण समोर थकीत बील वसुलीचे आव्हान! परभणी जिल्ह्यातील स्थिती

या संदर्भात सुचना असल्याने मागील आठवड्यात शाळेत मागील वर्षीची पुस्तके विद्यार्थ्यांकडून जमा करून घेण्यात आली होती. ती पुस्तके शैक्षणिक सत्र सुरु होताच केंद्रातील सर्व शाळेमधील विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके वाटप करून ऑनलाईन अध्यापनास सुरूवात झाली आहे.

हेही वाचा: हिंगोलीत खताची मागणी ९० हजाराची! मिळाले ६६ हजार मेट्रिक टन

पाठ्यपुस्तक मंडाळाकडून या वर्षी नवीन पुस्तके प्राप्त झाले नसल्याने पुस्तकाचा पुर्नवापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके ७५ ते ८० टक्के विद्यार्थ्यांकडून वाटप केली आहेत. त्या पुस्तकांचा पुर्नवापर विद्यार्थ्यांनी करावा म्हणून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली आहेत. दरम्यान, हिंगोली तालुक्यातील सवड केंद्रातंर्गत देऊळगाव रामा, वरूड गवळी आदी शाळेत केंद्रप्रमुख सुभाष जिरवणकर यांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आली तर केंद्रातील इतर सर्व शाळेत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली आहेत. जिल्ह्यातील इतरही ठिकाणी पुस्तक वाटप करण्यात आले.

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्यात यंदा सुवर्ण महोत्सवी भूजल अभियान राबविणार

पुस्तके नवीन जरी नाही मिळाले तरी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थी आनंदित झाले आहे. पुस्तके घेताना त्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता, पण ती विचारत होती सर शाळा कधी सुरू होणार आहे. शाळेपासून एक ते दिड वर्षापासून दूर असल्याने शाळेत येण्यासाठी विद्यार्थी मुले आतुर झाली आहेत. पण शाळा कधी सुरु होणार याचे उत्तर शिक्षकांकडे नसल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांपुढे नाउत्तर होण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात; क्षेत्र वाढले

शैक्षणिक सत्र सुरू झाले पण विद्यार्थी शाळेत येणार नाहीत. शाळेत विद्यार्थ्यांची किलबिल नसणार. केवळ शाळा सुरू असून शिक्षक उपस्थित आणि शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार. या ऑनलाईन पद्धतीने अध्यापनाचा फायदा केवळ मोबाईल ज्यांच्याकडे आहे त्याच मुलांना होणार आहे. ग्रामीण भागात अनेक कुटुंबाकडे तर मोबाईलच नाही. काही पालकांकडे आहेत पण विद्यार्थ्यांना मिळतच नाहीत, अशा परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करणे ही एक फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. (home delivery books were distributed to students on the first day of school in hingoli district)

loading image