आष्टी परिसरात सोळाशे जणांना होम क्वारंटाईन 

आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी बसलेले पथक.
आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी बसलेले पथक.

आष्टी ( जि.जालना) -  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आष्टी (ता.परतूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुंबई पुणे व अन्य महानगरातून आलेल्या तब्बल १ हजार ६९५ ग्रामस्थांची तपासणी करून त्यांना दोन आठवडे होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. 

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर कार्यन्वित झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. कोरोना प्रादुर्भाव संदर्भात सूचना दिल्या.

मागील आठवडाभरापासून बाहेरील नगरातून आलेल्या १हजार ६९५ जणांची तपासणी करून करून त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. परदेशातून आलेल्या अन्य दोन ग्रामस्थांना परतूर ग्रामीण रुग्णालय अंतर्गत कोरोना विशेष कक्ष ठिकाणी पाठवण्यात आले. कोरोनाबाधीत नसल्याची खात्री करून घेतली असल्याचे वैद्यकीय अधिकारी एस.एस.पाईकराव यांनी सांगितले. 

अनेक खासगी दवाखाने बंद 

आष्टी येथे १४ अधिकृत खासगी दवाखाने आहेत. तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या आष्टी अंतर्गत आष्टी सह परिसरातील २५ ते ३० गावातील रुग्ण उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात येतात.मागील काही वर्षापासून उपचारासाठी सरकारी दवाखान्यापेक्षा खासगी दवाखान्याकडे रुग्णांचा कल आहे.मात्र सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव भीतीने खासगी डॉक्टरांनी सावधानतेचा पवित्रा घेतला आहे.

दरम्यान १४ पैकी काही दवाखाने ठरावीक मोजक्याच वेळी उघडे राहतात तर निम्मे दवाखाने बंदच ठेवत आहेत. त्यामुळे इतर आजाराचे रुग्णांची उपचाराबाबत हेळसांड होत तक्रारी येत आहेत. कोरोना वगळता साध्या आजाराच्या रुग्णांना नाइलाजाने सरकारी दवाखान्यात जावे लागत आहे. अनेक ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडत आहेत. 

गावातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी दवाखाने बंद केल्याचे निदर्शनास येत आहे. रुग्णालयात बाह्य रुग्णांना अत्यावश्‍यक सेवा न मिळाल्यास नोंदणी रद्द करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा चिकित्सक अधिकारी यांच्या पत्राद्वारे आवश्यकतेनुसार रुग्णसेवा २४ तास देण्यासंदर्भात संबंधित डॉक्टरांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत, अशांवर कडक कारवाई करण्यात येईल. 
- एस.एस.पाईकराव 
वैद्यकीय अधिकारी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com