जालना : पोलिस अधिकाऱ्यासमोर हॉटेलमालकाचा राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime_1020.jpg

मध्यरात्री हॉटेल सुरु ठेवत केली धक्काबुक्की 

जालना : पोलिस अधिकाऱ्यासमोर हॉटेलमालकाचा राडा

जालना : मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू असल्याने कारवाईसाठी गेलेल्या तालुका जालना पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याला देवमुर्ती शिवारातील रविराज हॉटेल मालकाने धक्काबुक्की केल्याचा प्रकार बुधवारी (ता.१२) रात्री घडला आहे. या प्रकरणी हॉटेलमालक संशयित सुरेश कदम याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

रात्री उशिरापर्यंत हॉटेल, ढाबे बंद सुरू ठेवू नये, असे पोलिस अधीक्षकांचे आदेश आहेत. त्यामुळे बुधवारी (ता.११) रात्रगस्तीवर असलेल्या तालुका जालना पोलिस ठाण्याच्या पथके रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास देवमुर्ती शिवारात रविराज नावाचे हॉटेल सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे या पथकाने हॉटेल बंद करण्यासाठी गेले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हॉटेलच्या व्यवस्थापकास हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्धारित वेळ केव्हाच संपलेला आहे. त्यामुळे हॉटेल तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, काहीवेळानंतर हॉटेल मालक सुरेश कदम तेथे आला. त्याने सहायक पोलिस निरीक्षक संभाजी वडते यांच्याशी हुज्जत घातली, शिवाय धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर तालुका जालना पोलिसांनी रविराज हॉटेल मालक सुरेश कदम याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक वडते यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात सुरेश कदम याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे यासह विविध कलमांनुसार दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवसिंग बहुरे हे करीत आहे.

 देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top