अपघातात उजवा हात गमावलेल्या तरुणाच्या उपचारासाठी माणुसकीचे दर्शन  

बाबासाहेब गोंटे 
Saturday, 24 October 2020

शेवगा (ता. अबंड) : तरुण शेतकरी बाळू तिकांडेच्या उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू. 

अंबड (जि.जालना) : तालूक्यातील शेवगा येथील शेतकरी कुटुंबातील बाळू नानाभाऊ तिकांडे यांची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे रोजगाराच्या शोधात ते तालूक्यातील कर्जतला महावितरणच्या सबस्टेशमध्ये कामाला रुजू झाले. पोटाची ठिणगी विझेल अशी आशा पल्लवित झाल्यानंतर त्या ठिकाणी ते मोठ्या निष्ठेने काम करु लागले. मात्र दुदैवाने मोठा अपघात झाल्याने त्यांचा उजवा हात त्यांना गमवावा लागला. आणि उपचारासाठी सुरु झाला खरा संघर्ष. सकाळच्या वतीने मदतीसाठी वृत्त प्रकाशित होताच अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. या प्रकारानंतर माणुसकी अजूनही जीवत असल्याचा प्रत्यय आला आहे.    

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर लागणारा पैसा आणायचा कोठून हा प्रश्न तिकांडेच्या कुटुंबियांसमोर उपस्थित झाला. ते हतबल झाले होते. उपचारासाठी लाखो रुपये लागू शकतात असे डॉक्टरांनी सूचविल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमिन हिसकावली. याबाबत 'सकाळ' च्या माध्य़मातून बाळूला हवी मदतीची गरज वृत्त प्रकाशित झाले. वृत्त प्रकाशित होताच अनेक दानशुर मदतगारांनी मदतीसाठी सरसावले आहेत. जालना येथील समाजभान संस्थेच्या वतीने जालण्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कर्जत (ता. अंबड) येथील राजुरेश्वर ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भिमराव  डोंगरे, राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जतचा सर्व कर्मचारी, चेअरमन ज्ञानेश्वर डोंगरे, उमेश डोंगरे, रविंद्र डोंगरे, उध्दव उगले, दादाराव  डोंगरे यांनी अर्थिक मदतीसाठी पुढाकार घेत  बावीस हजार चारशे तीस रुपये गुरूवार (ता.२३) रोजी त्यांच्या शेवगा ता.अंबड येथे घरी जाऊन बाळूच्या कुटुंबियाला मदत केली. तर आणखी मदतीचा ओघ सुरु असून दानशूरांनी मदतीसाठी सामोरे यावे असे आवाहन केले जात आहे.  

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Humanity vision for treatment young man who lost his right hand in accident ambad news