esakal | परळीत छत्रपतींचा पुतळा उजळला शेकडो दिव्यांनी! 
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji maharaj.jpg

शिवछत्र प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम - दिवाळीनिमित्त दिपोत्सव, सहा वर्षांपासून युवकांचा पुढाकार 

परळीत छत्रपतींचा पुतळा उजळला शेकडो दिव्यांनी! 

sakal_logo
By
प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड) : परळी येथील शिवछत्र प्रतिष्ठानच्या वतीने दिपवाळीनिमित्त शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला. यावेळी मशालीही प्रज्वलित करुन दीपोत्सव साजरा करण्यात आला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मागील सहा वर्षापासून हा उपक्रम येथील शिवछत्र प्रतिष्ठानच्या वतीने सुरू आहे. दिवाळीनिमित्त शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता उद्यानातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळयाची स्वच्छता करुन परिसर सुशोभित करण्यात आला. शनिवारी. रविवारी आणि आज सोमवारी सायंकाळी शंभरावर पणत्या याठिकाणी प्रज्वलित केल्या गेल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवाय चारही बाजूने मशाली लावण्यात आल्या. यामुळे शिवछत्रपती व जिजाऊंचा पुतळा शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. यावेळी शिवछत्र प्रतिष्ठानचे श्रीकांत माने, लक्ष्मण कलमे, ॠषी राठोड, राज जाधव, सोनू शिंदे, संदीप देशमुख, भूषण जाधव, संजय कदम, सोमेश कांदे, प्रवीण तरडे, रोहित खासरे, सुशिल पाटील यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)