वाढदिवसाची बॅनरबाजी न करता केले हे आदर्श काम... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा करणारे येथील कार्यकर्ते लक्ष्मीकांत तवले यांनी यंदा बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करताना बॅनरबाजीचा खर्च टाळला.

मुरूड (जि. लातूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा करणारे येथील कार्यकर्ते लक्ष्मीकांत तवले यांनी यंदा बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करताना बॅनरबाजीचा खर्च टाळला. बचत झालेल्या रक्कमेतून मुरूड जिल्हा परिषद गटातील सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त विधवांच्या नावे प्रत्येकी दोन हजार ऐंशी रुपये मुदत ठेवीत (एफडी) गुंतवले.

या वेळी सरपंच अभयसिंह, उपसरपंच आकाश कणसे, माजी सरपंच जयश्री पांगळ, गुंफावाडीचे उपसरपंच आदिनाथ गायकवाड, माजी सरपंच रामानंद जाधव, अक्षय चव्हाण, निलेश नाडे, महेश सुरवसे, भालचंद्र धावारे, राहुल टिळक, अमर जयदेव मोरे, दत्ता नाडे, सतीश मिसाळ, समाधान नाडे, अजय पिंगळे, अजित खोडसे, आनंद शिंदे व दत्ता धुमाळ उपस्थित होते. डॉ.कै. पद्मश्री आप्पासाहेब पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले श्री. तवले दरवर्षी पवार यांच्या वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करतात. जिल्हा परिषद गटात ते वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाचे बॅनर लावतात.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

यंदा त्यांनी बॅनरबाजीला फाटा देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यातूनच खर्चातील बचतीची रक्कम त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावे दामदुपट मुदत ठेवीत गुंतवली. यासोबत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद गटातील एक कोटी पन्नास लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा प्रारंभ गुंफवाडी (ता. लातूर) येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी राजूबाई वेंकट वगरे यांच्या हस्ते केला. या वेळी विष्णू महानवर, दत्ता महानवर, पवन झोडगे, अनंत शिंदे, पांडुरंग शिंदे, मकरंद पिंपरे, प्रमोद गाडे, शिवलाल गाडे, विक्रम पिंपरे उपस्थित होते.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ideal Work of Helping Farmers on Sharad Pawar Birthday Latur News