
नांदेड : महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिक विविध करांचा भरणा करत आहेत. २०१३ पासून आॅनलाइनची योजना सुरू झाली असली तरी त्याचा वापर गेल्या दोन-तीन वर्षांत अधिक वाढला आहे.
प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासोबतच पेपरलेस आणि आॅनलाइन कामाकाजावर भर देण्यासाठी महापालिकेच्या वतीने २०१३ पासून आॅनलाइनचा वापर सुरू केला आहे. त्याद्वारे बांधकाम परवानगी शुल्क, मालमत्ता, पाणीपट्टी व इतर कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे. त्यानिमित्ताने अनेक मालमत्ताधारकांनी आॅनलाइन कराचा भरणा केला असून त्यासाठी एक टक्का सवलतीचाही फायदा घेतला आहे.
आॅनलाइन कर भरणाऱ्यांच्या संख्येत होतेय वाढ
आॅनलाइनचा व्यवहार सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये ५८ जणांनी, २०१४-१५ मध्ये ८९७, २०१५-१६ मध्ये एक हजार ४३८, २०१६-१७ मध्ये दोन हजार २५७ आणि २०१८-१९ मध्ये चार हजार ५८३ जणांनी आॅनलाइन मालमत्ता कर, पाणीपट्टी करासह इतर करांचा भरणा केला आहे. २०१९ मध्ये सष्टेंबरपर्यंत दोन हजार ५१५ जणांनी आॅनलाइन करांचा भरणा केला आहे.
हेही बघितलेच पाहिजे - Video : बावरीनगरच्या धम्म परिषदेला सुरुवात
मालमत्ताकरांची आॅनलाइन वसुली
मालमत्ता कर आॅनलाइन भरणाऱ्यास सुरवात झाली. त्यात २०१३-१४ मध्ये ५३ जणांनी दोन लाख २९ हजार, २०१४-१५ मध्ये ७५८ जणांनी ६९ लाख ८१ हजार, २०१५-१६ मध्ये एक हजार १३७ जणांनी ७६ लाख ७५ हजार, २०१६-१७ मध्ये एक हजार २६४ जणांनी ९० लाख ९९ हजार, २०१७-१८ मध्ये एक हजार ८१५ जणांनी एक कोटी २० लाख, २०१८-१९ मध्ये तीन हजार ५७८ जणांनी तीन कोटी सहा लाख, तर २०१९-२० मध्ये ता. ३१ डिसेंबरपर्यंत तीन हजार १०९ जणांनी अडीच कोटी रुपयांचा आॅनलाइन भरणा केला आहे.
महापालिकेचे वेबसाईट, अॅप उपलब्ध
महापालिकेने www.nwcmc.gov.in या नावाने वेबसाईट सुरू केली आहे. त्या ठिकाणाहून विविध करांचा भरणा आॅनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तसेच सूचना व तक्रारीही करता येतात. त्याचबरोबर याच नावाने अॅपही सुरू केले असून ते मोबाईलवर डाऊनलोड करून त्यातूनही महापालिकेची माहिती मिळू शकते.
- अजितपालसिंघ संधू, उपायुक (नांदेड वाघाळा महानगरपालिका)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.