Corona Impact: लातुरात दीड हजारांवर उद्योगांची चाके थांबली, दहा हजार कामगार घरी

लॉकडाउन, ऑक्सिजन नाही, कच्चा माल येत नाही म्हणून कारखाने बंद आहेत
latur
laturlatur

लातूर: गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या संकटावर (covid 19 pandemic) मात करून कसे तरी उद्योगाची चाके रुळावर येत असतानाच दुसरी लाट सुरु झाली. याचाही मोठा फटका उद्योग क्षेत्राला बसत आहे. लॉकडाउन सुरु झाल्याने एमआयडीसीतील दीड हजारावर उद्योगांची चाके थांबली आहेत (lockdown impact on latur industries). कोट्यावधीचा फटका बसत आहे. उद्योग बंद राहिल्याने दहा हजार कामगार सध्या घरीच आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. कोरोनाचे संकट टळून पुन्हा उद्योगाचे चक्र कधी सुरु होते याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

उद्योगांचा शटर डाउन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. येथील एमआयडीसी, अतिरिक्त एमआयडीसी, तालुका ठिकाणच्या लहान एमआयडीसी असे दोन हजारावर कारखाने आहेत. एप्रिलपासून सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे दीड हजार पेक्षा जास्त कारखान्यांचे शटर डाउन आहे. डाळ मिल, तेल मिल असे केवळ जीवनावश्यक वस्तूच्या संदर्भातीलच सुमारे चारशे उद्योग कसबसे सुरु आहेत.(industries during lockdown latur oxygen covid19 marathwada economy)

latur
'मंत्री भुमरेंविरोधात काय कारवाई केली?' खंडपीठाचा प्रश्न

ऑक्सिजनअभावी काम बंद
येथील एमआयडीसीत ऑक्सिजनचा वापर करून चालणारे सुमारे ७५० उद्योग आहेत. सध्या तीन प्लांटमधून तयार होणारा सर्वच ऑक्सिजन कोरोनाच्या रुग्णावर उपचारासाठी वापरला जात आहे. उद्योगांचा ऑक्सिजन बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी हे सर्व कारखान्यांचे काम बंद आहेत.

कामगारांपुढे अडचणी
लॉकडाउन, ऑक्सिजन नाही, कच्चा माल येत नाही म्हणून कारखाने बंद आहेत. याचा परिणाम दहा हजार कामगारांच्या हाताला कामच नाही. काही मोठे उद्योग कामागारांना घरी बसून पगार देत आहेत. पण लहान उद्योग व त्यांच्या कामगारांना मात्र अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कारखाने कधी सुरु होणार याकडे लक्ष लागले आहे.

latur
चिंताजनक! मराठवाड्यातील रुग्णसंख्येत घट मात्र मृत्यूदर वाढताच

सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भातील सुमारे चारशे उद्योग सुरु आहेत. कामगारांच्या निवासाची सोय असलेले कारखाने सुरु करण्याची परवानगी आहे. सध्या सर्वच ऑक्सिजन मेडिकलसाठी वापरला जात आहे. त्यामुळे ऑक्सिजनवर चालणारे सर्वच उद्योगही बंद आहेत.
- महेशकुमार मेघमाळे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, लातूर

गेल्या वर्षापासून कोरोनाच्या काळात उद्योगांचे कंबरडे मोडलेले आहे. महागाई, पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव, कच्चा मालाच्या किंमती वाढल्याने उद्योग क्षेत्र अधिकच अडचणीत आहे. त्यात पुन्हा लॉकडाउन सुरु झाले. ऑक्सिजनशिवाय अनेक उद्योग बंद आहेत. शासनाने किमान वीस टक्के ऑक्सिजन उद्योगासाठी उपलब्ध करुन दिला तर किमान कामगारांचा उदरनिर्वाह होवू शकतो.
- शब्बीर शेख, उद्योजक, साईबाबा ट्रेलर्स, एमआयडीसी, लातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com