esakal | केज रोहयो कामात अनियमितता; चौकशीला असहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकाला दिवाळीत घरचा रस्ता 
sakal

बोलून बातमी शोधा

rohyo.jpg

तालुक्यातील चिंचोलीमाळी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकाने रोजगार हमी योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी नेमलेल्या पथकाला सहकार्य केले नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुरुवार (ता.१२) रोजी ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश काढले. 

केज रोहयो कामात अनियमितता; चौकशीला असहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकाला दिवाळीत घरचा रस्ता 

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (बीड) : तालुक्यातील चिंचोलीमाळी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकाने रोजगार हमी योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी नेमलेल्या पथकाला सहकार्य केले नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुरुवार (ता.१२) रोजी ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश काढले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तालुक्यातील चिंचोलीमाळी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक एल. जी. सोनवणे यांच्या विरोधात ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. पथकाने चौकशी करून चौकशीचा अहवाल सादर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. अहवालानुसार ग्रामसेवक एल. जी. सोनवणे यांनी अभिलेख उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे प्रकरणाची खातरजमा करता आली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामपंचायतीचे अभिलेख ग्रामपंचायतमध्ये ठेवणे आवश्यक असताना ते ठेवले नाही. कोविडच्या काळात खरेदी केलेले मास्क व फवारणी औषधाचे वाटप रजिस्टर चौकशी दरम्यान उपलब्ध नव्हते. त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटिसचाही खुलासा ग्रामसेवक सोनवणे यांनी केला नाही. त्यामुळे चौकशी पथकास ग्रामपंचायतीचे अभिलेख उपलब्ध करुन दिले नसल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवक एल. जी. सोनवणे यांच्याविरोधात निलंबनाची कार्यवाही करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी काढले आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)