esakal | हिंगोली जिल्‍ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस बरसला
sakal

बोलून बातमी शोधा

sandas salegaw Bridge

हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आदी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळेवातावरणातही गारवा निर्माण झाला होता. कळमनुरी शहरात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली.

हिंगोली जिल्‍ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस बरसला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्‍ह्यात शनिवारी (ता.२०) सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता.

 हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आदी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळेवातावरणातही गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, कळमनुरी शहरात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली.

हेही वाचा - पोलिस मुख्यालयातच कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या -

विजेचे खांब कोसळल्याचे वृत्त

 तर बसस्थानक परिसरातील पानटपऱ्या, काही खोके व शेड कोसळून फुटकळ व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर उडून गेलेल्या टिनपत्र्याचा शोध सुरू होता. अनेक ठिकाणी विजेचे खांब व वीजवाहिन्या कोसळल्याचे वृत्त असून बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.

सरासरी १६.४२ मिलीमीटर पावसाची नोंद

जिल्‍ह्यात मागील चोवीस तासात शनिवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १६.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस सेनगाव तालुक्‍यात झाला असून येथे २५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यातील अकरा गावे ठरली हॉटस्‍पॉट -

सेनगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस

मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे(मिलीमीटरमध्ये) हिंगोली २२.०, खांबाळा १०.०, माळहिवरा ३८.०, सिरसम बुद्रूक ९.०, बासंबा ३०.०, नरसी नामदेव ४.०, डिग्रस ९.०, कळमनुरी ३०.०, नांदापूर २३.०, आखाडा बाळापूर ११.०, डोंगरकडा ५.०, वारंगाफाटा २.०, वाकोडी ११.० सेनगाव १७.०, गोरेगाव २८.०, आजेगाव ३२.०, साखरा ४६.०, पानकन्हेरगाव ७.०, हत्ता २१.०, वसमत २.०, हट्टा निरंक, गिरगाव ८.०, कुरुंदा ५.०, टेभुर्णी १९.०, आंबा १८.०, हयातनगर ६.०, औंढा नागनाथ १०.०, जवळा बाजार २८.०, येहळेगाव २०.०, साळणा १२.०