अरे बाप रे..! रुग्णसंख्या एवढी की, अख्ख्या गावाला केले क्वारंटाईन   

corona.jpg
corona.jpg

जळकोट (जि.लातुर) :  शहरात (ता.आठ) रोजी पुन्हा तीन व्यक्तीचे अहवाल पाँझिटीव्ह आले असून शहरात एकुण रूग्णांची संख्या आठवर गेली आहे. तर माळहिप्परगा येथील माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य यांना कोरोनाची लागण झाली आहे. शहर व तालुक्यातील एकुण रुग्णांची संख्या सतरा झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रंशात कापसे यांनी दिली.

शहरात गेल्या आठ दिवसापासून कोरोनाच्या रूग्णात वाढ दिसून येत आहे. आठ दिवसात पाच रुग्णांची वाढ झाली आहे. शहरातील व्यापाऱ्यांची (ता.सात) पासून रँपिड ॲंटीजेन टेस्ट सुरु करण्यास आरोग्य विभागाने सुरूवात केली आहे. शहरातील आण्णाभाऊ साठे चौकातील एका व्यक्तीचा अहवाल पाँझिटीव्ह आला होता. आठ रोजी शहारील मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्यांचा व त्याच्याच दुकानातील दोन कामगाराचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. शहरासह तालुक्यात एकुण रुग्णांची संख्या सतरा झाली आहे.

आरोग्य विभागाकडून (ता.आठ) रोजी निघालेल्या पाँझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तीनही व्यक्तीच्या कुंटूबातील व्यक्तीचे स्वँब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर माळहिप्परगा येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याने एकोणावीस घरातील ९० जणांना क्वारंटाईन करण्यात आले. संपर्कातील लोकांचे स्वँब तपासणीसाठी घेण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा. विनाकारण घराबाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी, आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार संदीप कुलकर्णी, पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, नगराध्यक्ष किसन धुळशेट्टे यांनी केले आहे.

संपादन-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com