टाळेबंदीत 'शेवंती' गेली ! तर दोन दिवसांच्या वादळी पावसाने 'होत्याचे नव्हते केले'

विवेक पोतदार
Tuesday, 15 September 2020

जळकोट तालुक्यातील शेतकरी किशन नारसन्ने यांचे दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात शेवंतीची शेतीला योग्य भाव न मिळाल्याने आधीच नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. तर आता अतिशय वादळ पावसाने झेंडू फुल शेतीचे वाटोळे झाले आहे. आता जगायचे कसे असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.  

जळकोट (लातूर) : येथील युवा शेतकरी अनंत किशन नारसन्ने यांनी खूप मोठा खर्च करुन जोपासलेल्या टाळेबंदीत शेवंती शेतीचे तर सोमवारी रात्री व मंगळवारी (ता.१५) सकाळी पडलेल्या वादळी पावसाने झेंडू शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. हाती आलेल्या पिकांचे नुकसान पाहून शेतकरी श्री. नारसन्ने चिंतातूर झाले आहेत. विशेष म्हणजे अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले असून सरकार कडून काही मदत मिळेल का अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

एकीकडे कोरोनाचे संकट असताना अडचणीत सापडलेला शेतकरी येणार्या सण-उत्सवात फुलाला चांगली मागणी मिळून चार पैसे हाती येतील या आशेने झटतात. जळकोट येथील युवा शेतकरी अनंत किशन नारसन्ने या युवा शेतकर्याने फुलशेती केली. त्यांना दोन एकर शेती असून विहिरीच्या पाण्याचा उपयोग करुन गेल्या पाच-सहा वर्षापासून या भागात फुलशेतीचा यशस्वी प्रयोग करत आहेत. स्थानिक बाजारपेठेत त्यांच्या विविध फुलांना मागणी असते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टाळेबंदीत त्यांची बहरलेली शेवंतीच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. बाजारपेठ व मागणी नसल्यामुळे जवळपास एक-दिड लाखाची फुले तोडणी न करता सोडून द्यावी लागली त्यानंतर झेंडु शेती नुकसानीमुळे त्यांच्यावर दुसर्यांदा आलेली ही आपत्ती आहे. त्यांच्या अनेक नव्या प्रयोगातून युवा शेतकर्यांना प्रेरणा मिळते. परंतू सोमवारी रात्री व मंगळवारी (ता.१५) सकाळी पडलेल्या वादळी पावसाने झेंडूची झाडे आडवी पडली आहेत. त्यामूळे जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जून महिन्यात लातूर येथील नर्सरीतून तीन हजार रोपटे आणून ३० गुंठे झेंडू शेती केली. विहिरीचे पाणी देत आठवड्याला नियमित किटकनाशकाची फवारणी करत फुलशेती या कुटुंबाने जोपासली. तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केले. सर्व कुटुंब या फुलशेतीत राबते. कष्टाने डोळ्याचे पारणे फेडणारा हा प्लॅंन्ट दिसत होता. फुल तोडणीस आले असताना अचानक या पावसाने मोठे नुकसान केले. ऐन फुलाने बहरलेली झाडे वादळी पावसाने जमीनदोस्त झाली. हे  चित्र पाहून डोळ्यात पाणी उभारले असून शेतकरी  श्री. नारसन्ने  चिंतेत आहेत.

 

यावर्षी पहिल्यांदा टाळेबंदीमुळे बाजारपेठ नसल्याने शेवंती शेतीत एक ते दिड लाखाचे नुकसान सहन करावे लागले.त्यानंतर सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी पडलेल्या वारा व पावसाने झेंडु फुलाची झाडे आडवी पडली असून ती नासून जाणार,झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलो आहे. शासनाने पाहणी करुन मदत करावी. 
श्री. अनंत नारसन्ने (युवा शेतकरी)

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalkot farmer heartbreaking story two days of torrential rains have lost marigold flowers