Corona : जळकोट तालूक्यात वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू, बळींची संख्या तीन वर

शिवशंकर काळे
Wednesday, 29 July 2020

शहरातील व्यापाऱ्याच्या एकाच कुटूंबातील २ जणाला कोरोनाची बाधा झाल्याने  जळकोटकरांना मंगळवारचा दिवस धक्का देणारा ठरला आहे. शिवाय धामणगाव ता. जळकोट येथील ७५ वर्षाच्या निवृत्त शिक्षकांचा मृत्यू झाला असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

जळकोट (लातूर) : शहरातील व्यापाऱ्याच्या एकाच कुटूंबातील २ जणाला कोरोनाची बाधा झाल्याने  जळकोटकरांना मंगळवारचा दिवस धक्का देणारा ठरला आहे. शिवाय धामणगाव ता. जळकोट येथील ७५ वर्षाच्या निवृत्त शिक्षकांचा मृत्यू झाला असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

तालूक्यातील घोणसी गावात १ तर जळकोट शहरात गावात २, धामणगाव २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.  कोरोनाचे वारे शांत झाले होते. मात्र शहरातील व्यापाऱ्याच्या घरातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला जळकोट तालुक्याच्या शेजारील असलेल्या तिरुका  गावापुरता मर्यादित असणारा आता शहरात पोहचला असून जुलैचा शेवटचा आठवडा जळकोटकरांची झोप उडविणार ठरला आहे. पोलीस, महसूल, आरोग्य प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याने तालुका टाळेबंदी करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील  २२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

दरम्यान शहरातील कृषीनगर भागातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. मंगळवारी दुसरा पॉझिटिव्ह आला. शहर, ग्रामीण भागात आता आठ रुग्णांची संख्या झाली आहे. तालुक्यात कोरोनामुळे तिघांचा मृ्त्यू झाला असून यात एकुर्गा, तिरुका, धामणगाव (ता.जळकोट) या गावाचा समावेश आहे.

Edited by pratap awachar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalkot tahsil corona update one old person death