
महामार्गाचे काम करण्यासाठी दिड महिन्यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांचे खोद काम केले आहे.
जळकोट (लातूर): शहरातील मुख्य रस्त्यावर महामार्गाचे काम चालू आहे. कामामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याची एक किलोमीटर पाईपलाईन अडीच महिन्यापासून नादुरुस्त झाल्याने बसस्थानक परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध असूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
महामार्गाचे काम करण्यासाठी दिड महिन्यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांचे खोद काम केले आहे. एक साईड महामार्गाचे कामही पूर्ण झाले आहे. या खोदकामात दिड महिन्यांपूर्वी मुख्य पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन खोदकाम करताना निकामी झाली आहे. सदर लाईनचे गुत्तेदारांना ईस्टीमेट नगरपंचायतीकडून देऊन दोन महिने उलटले आहेत. पंरतू अद्याप नवीन पाईपलाईनचे काम सुरु करण्यात आले नाही.
बसस्थानक परिसरात हजारो नागरिकांचे वास्तव आहे. या भागाला नगरपंचायतकडून दर सहा दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. पंरतू पाण्याची मुख्य लाईन नादुरूस्त झाल्याने दिड महिन्यांपासून महिला व नागरिकाना पाणी उपलब्ध असूनही भिषण पाणीटंचाईला तोड द्यावे लागत दररोज पाणी विकत घेतल्याशिवाय काहीना पर्याय उरलेला नाही.
नगरपंचायत प्रशासन याबाबत मूग गिळून गप्प बसले आहे. या गुत्तेदारांना उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी एक महिन्यापूर्वी बैठक घेऊन पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम तातडीने करण्याच्या सुचना देऊन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. पंरतू गुत्तेदार व नगरपंचायत प्रशासनाकडून आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.
उदगीरमध्ये युवक उमेदवारांना मतदारांची पसंती; ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का | eSakal
दरम्यान गुत्तेदार व नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोड द्यावे लागत आहे.चार दिवसात पाईपलाईनचे काम नाही झाल्यास तहसीलदार कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे
(edited by- pramod sarawale)