जालन्यात अजबच प्रकार, चक्क नळाद्वारे येते दारू, अखेर पोलिसांनीच केले हे...! 

उमेश वाघमारे 
शनिवार, 27 जून 2020

जालना जिल्ह्यात चक्क दारूचे हातपंप असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. शहरातील लोहार मोहला येथे शनिवारी दारू बंदी पथकाने छापा टाकून दोन हातबट्ट्या उद्ध्वस्थ केल्या. यात लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

जालना :  मराठवाडा म्हटले की मागासलेला आणि पाण्यापासून वंचित असलेला प्रदेश आहे. मात्र मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात चक्क दारूचे हातपंप असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. शहरातील लोहार मोहला येथे शनिवारी दारू बंदी पथकाने छापा टाकून दोन हातबट्ट्या उद्ध्वस्थ केल्या. यात लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

शहरातील लोहार मोहल्ला येथे शनिवारी (ता.27) दारू बंदी विशेष पथकाने छापा टाकून दोन हातभट्ट्या उद्ध्वस्थ करीत 92 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
जालना शहरासह जिल्ह्यातील हातभट्ट्यांची चूल कायम सुरू आहे. पोलिसांकडून सतत कारवाया केल्या जात असल्या तरी हातभट्टी दारू निर्मिती करणारे या कारवायांना मोजण्यास तयार नाहीत. त्यामुळे गावठी दारूचा गोरख धंदा जिल्ह्यासह शहरात तेजीत सुरू आहे. शहरातील लोहार मोहल्ला येथे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर शनिवारी (ता.27) दारू बंदी विशेष पथकाने छापा टाकाला.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

यावेळी येथे दोन हातभट्ट्या सुरू असल्याचे या पथकास दिसून आले. या पथकाने या हातभट्ट्या उद्धवस्त करून गावठी दारू, रसायन असा एकूण  92 हजार 700 रुपयांची मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान पोलिसांना पाहून हातभट्टी दारू तयार करणारी महिला फरार झाली आहे.  या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

ही कारवाई  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलिस उपनिरीक्षक संमत पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सय्यद उस्मान, सुरेश राठोड, रामेश्वर बघाटे, राजेंद्र वेलदोडे, श्री. पव्हुरे, किशोर जाधव, परमेश्वर धुमाळ, दीपक चव्हाण, महिला कर्मचारी अल्का केंद्रे, रत्नमाला येडके, धोंडीराम मोरे यांनी केली.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

हातभट्ट्यांची चूल बंद करणे खरचं अशक्य आहे का?

जिल्ह्यासह शहरात सुरू असलेल्या हातभट्ट्या कायमस्वारूपी बंद करणे खरचं पोलिसांना अशक्य आहे ? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. शहरात चार पोलिस ठाणे असून देखील शहरामध्ये ठराविक ठिकाणी हातभट्ट्यांची चूल कायम पेटलेली आहे. हे सर्वांना माहिती असतांना देखील हातभट्टीची चूल कायमची का बंद होत नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Alcohol comes through the chuck tube