esakal | जालन्यात गोदामाला भीषण आग, कोट्यावधी रुपयांचा कापूस जळून खाक
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Fire News

आगीमध्ये सीसीआयने खरेदी केलेला कोट्यावधी रूपयांचा कापूस जळून खाक झाला. तर गोदामाची भिंतही कोसळली आहे.

जालन्यात गोदामाला भीषण आग, कोट्यावधी रुपयांचा कापूस जळून खाक

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जालना-राजूर रस्त्यावरील वखार महामंडळाच्या दहा क्रमांकाच्या गोदामाला शुक्रवारी (ता.१२) भीषण आग लागली. या आगीमध्ये सीसीआयने खरेदी केलेला कोट्यावधी रूपयांचा कापूस जळून खाक झाला. तर गोदामाची भिंतही कोसळली आहे. जालना-राजूर मार्गावर वखार महामंडळाचे गोदाम आहे. या वखार महामंडळाच्या दहा क्रमांकाच्या गोदामाला शुक्रवारी (ता.१२) अचानक आग लागली. या दहा क्रमांकाच्या गोदामामध्ये सीसीआयमार्फत खरेदी केलेला कापूस ठेवण्यात आलेला होता.

तुळजाभवानी मातेचे दर्शन ठरले शेवटचे, पुण्याच्या भाविकाचा तुळजापुरात भोवळ येऊन मृत्यू

शुक्रवारी गोदामातून अचानक धूर निघत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला या संदर्भात माहिती. त्यानंतर जालना आग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, गोदामामध्ये कापसाच्या आठी असल्याने आग आटोक्या येत नव्हती. त्यामुळे जालन्यासह परतूर, मंठा, भोकरदन, अंबड, शेंद्रा औद्योगिक वसातह, बीड, औरंगाबाद महानगरपालिका येथून अग्निशामक दलाला बोलविण्यात आले होते.

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंची राज्य सरकारकडे चौकशीची मागणी

त्यामुळे सात बंबाच्या मदतीने ही आग अटोक्यात आणण्यात आली. तसेच खासगी टँकरव्दारे या बंबाना पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, या आगीत दहा क्रमांकाच्या गोदामातील संपूर्ण सुमारे साडेचार ते पाच हजार कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे कोट्यावधी रूपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी संदीप सानप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

संपादन - गणेश पिटेकर