Corona-Virus : जालन्यात आज २८ बाधित, आता ७६४ रुग्णांवर उपचार सुरु 

उमेश वाघमारे 
Tuesday, 4 August 2020

जालना जिल्ह्यात चार महिन्यात चोवीसशे कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. त्यापैकी एक हजार ५६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७६४ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

जालना : जालना जिल्ह्यात कोरोना मीटर सुरू आहे. मंगळवारी (ता. चार) २८ कोरोनाबाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परिणामी जालना जिल्ह्यात चार महिन्यात चोवीसशे कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. त्यापैकी एक हजार ५६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७६४ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

जालना शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. जालना शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात प्रत्येक दिवसाला कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात केवळ तीन कोरोनाबाधित रूग्ण असलेल्या जालना जिल्ह्यात (ता.चार) ऑगस्टपर्यंत तब्बल दोन हजार ४०५ कोरोनाबाधित रूग्ण झाले आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढ असताना कोरोनाग्रस्त रूग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ही वाढल्याचे चित्र आहे. जालना येथील कोविड रूग्णालय येथे आतापर्यंत उपचाराअंती एक हजार ५६७ कोरोनाग्रस्त रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रूग्णांचा रेकव्हरी रेटही वाढत असल्याने दिलास मिळला आहे. दरम्यान सध्या ७६४ कोरोनाग्रस्तांवर कोव्हीड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

७४ जणांचा आतापर्यंत मृत्यू
जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांच्या काळात जिल्ह्यात दोन हजार ४०५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी आतापर्यत ७४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू झालेल्या रूग्णांमध्ये जालना शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या अधिक आहे. 

Edited By Pratap Awachar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna corona Update today 28 new corona patient