CORONA UPDATE : जालन्यात कोरोनाचा कहर सुरुच, आज ३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

महेश गायकवाड
मंगळवार, 30 जून 2020

जालना शहरात कोरेानाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी ४३, सोमवारी अठरा आणि आज पुन्हा ३२ रूग्णांची भर पडल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ५५४ वर पोचला आहे.

जालना : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जालनेकर गांर्भीयाने घेत नसल्याने आणि शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत नसल्याने जिल्ह्यात कोरोनाचा जोर वाढला आहे. आज सकाळी आरोग्य विभागाला पुन्हा ३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. यात जालना शहरातील तब्बल २७ जणांचा समावेश आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

जालना शहरात कोरेानाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी ४३, सोमवारी अठरा आणि आज पुन्हा ३२ रूग्णांची भर पडल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ५५४ वर पोचला आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

या भागातील रुग्णांचा समावेश 
 
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये शहरातील विणकर मोहल्ला सात, हॉटेल अमित परिसरातील तीन, वसुंधरानगर मधील तीन, जुना जालना भागातील संजोग नगरमधील दोन, मस्तगड, भरत नगर, व्यंकटेश नगर, जेपीसी बॅंक कॉलनी, बरवार गल्ली, संभाजी नगर, सत्कर नगर, अकेली मस्जिद, मिशन हॉस्पिटल, मंगल बाजार, नरीमन नगर, आणि पेन्शनपुरा या भागातील प्रत्येकी एक तर जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील चार रुग्णांचा समावेश आहे. सातत्याने रूग्णांची भर पडत असल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ५५४ झाला असून त्यापैकी ३३६ रुग्ण बरे झाले आहे. सध्या रुग्णालयात ३०५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत तेरा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

जालना कोरोना मिटर
एकुण बाधित ५५४
बरे झाले ३३६
उपचार सुरू २०५
मृत्यू १३

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna corona update today 31 new positive patient