Corona : जालन्यात आज ७१ रुग्णांची वाढ; कोरोनाबाधितांची तीन हजारांकडे वाटचाल

corona.jpg
corona.jpg

जालना : जिल्ह्यात कोरोनाचा 'वार' सुरूच असून मंगळवारी (ता.११) सकाळी नव्याने ७१ कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ९८६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची तीन हजारांकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.

जालना शहरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर शहराला कोरोनाने वेढा घातला. मात्र, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झालेला नव्हता. परंतु मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाबाधितांचे रूग्ण आढळून येत आहेत.

जिल्ह्यात प्रतिदिन कोरोनाबाधितांच्या रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. मंगळवारी (ता.११) सकाळी जिल्ह्यात नव्याने ७१ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात दोन हजार ९८६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान १४३ स्वॅबचे अहवाल प्रयोगशाळेकडून येणे बाकी आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या बाबत जिल्ह्याची वाटचाल तीन हजारांकडे सुरू असल्याचे चित्र आहे. 

दरम्यान आतापर्यंत एक हजार ८१० कोरोनाग्रस्तांनी उपचाराअंती कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या एक हजार ७६ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत शंभर जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

  • एकूण रुग्ण - २९८६
  • कोरोना मृत्यू - १००
  • कोरोनामुक्त - १८१०
  • उपचार सुरु - १०७६ 

(संपादक - प्रताप अवचार)

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com