CORONA UPDATE : जालन्यात कोरोनाचे संक्रमण थांबेना, आज पुन्हा २७ रूग्णांची वाढ 

महेश गायकवाड
बुधवार, 1 जुलै 2020

मंगळवारी ३१ रूग्णांची भर पडल्यानंतर बुधवारी (ता. एक) सकाळी २७ संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. यात २१ रूग्ण हे जालना शहरातील विविध भागातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

जालना : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही जालना शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. मंगळवारी ३१ रूग्णांची भर पडल्यानंतर बुधवारी (ता. एक) सकाळी २७ संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. यात २१ रूग्ण हे जालना शहरातील विविध भागातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

जालना शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नवीन व जुन्या जालन्याला जोडणारे सर्व पुलावरून वाहतुक बंद करण्यात आली आहे. मात्र, तरिसुद्धा गेल्या आठवड्यापासून जालना शहरात कोरोनाचे संक्रमण थांबत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ८३ संशयितांताचे स्‍वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७४ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये २७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यातील २१ जण हे शहरातील विविध भागातील आहे.  

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

या भागातील रुग्णांचा समावेश 

बाधित रूग्णांमध्ये जालना शहरातील बुऱ्हाण नगरमधील तीन, कसबा परिसर, गुरू गोवानगर भागातील प्रत्येकी दोन, संभाजी नगर, जेपीसी बॅंक कॉलनी, कन्हैय्या नगर, औद्योगिक वसाहत, बालाजी नगर, महावीर चौक, साईनगर, दानाबाजार, काद्राबाद, तट्टूपुरा, निवांत हॉटेल परिसर, विकास नगर, कालिकुर्ती, नरीमन नगर, नेहरू रोड व अंबर हॉटेल परिसरातील प्रत्येकी एक, तर अंबड तालुक्यातील एकलहेरा, रोहिलागड  येथील प्रत्येकी एक, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील एक आणि भोकरदन येथील दोघांचा पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये समावेश आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

जालना कोरोना मीटर

  • एकुण बाधित ५८०
  • बरे झाले ३५१
  • उपचार सुरू २१४
  • मृत्यू १५
  •  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Coronavirus 27 corona positive patient increase