Corona Update :  जालन्यात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, तर ३४ रूग्णांची झाली वाढ

महेश गायकवाड
Sunday, 5 July 2020

जालना शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांत झपाट्याने वाढ झाली आहे. हा सिलसीला सुरूच असताना मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

जालना : जिल्ह्यात कोरोनाचे धक्के सुरूच आहे. रविवारी (ता. पाच) ३४ संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. तर शहरातील ६५ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा २३ वा बळी गेला असून एकुण बाधितांचा आकडाही सातशेच्या वर गेला आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

जालना शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांत झपाट्याने वाढ झाली आहे. हा सिलसीला सुरूच असताना मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता वाढली आहे. रविवारी सकाळी १२९ संशयितांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यात ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरातील बाहे. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

या भागातील रुग्णांचा समावेश 
बुऱ्हाणनगर ७,दानाबाजार ५,काद्राबाद २,जेईएस कॉलेज मध्ये अलगीकरणात असलेले २,जेपीसी बॅंक कॉलनी ४,गांधीनगर २,क्रांतीनगर, भाग्यनगर,सुवर्णकार नगर,नलगल्ली, संभाजीनगर,कन्हैयानगर या भागातील प्रत्येकी एक, अंबड तालुक्यातील भालगाव आणि दहीपुरी येथील प्रत्येकी १,परतूर तालुक्यातील शेवगव्हाण , जालना तालुक्यातील चुरमापुरी आणि औरंगाबाद येथील रामगोपाल नगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली  

दरम्यान,जालना शहरातील गांधीनगर मधील एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. वाढलेल्या ३४ रुग्णामुळे आतापर्यं बाधित रूग्णांची संख्या आता ७१९ इतकी झाली असून त्यापैकी ४०१ रुग्ण बरे झाले आहे. सध्या रुग्णालयात २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Coronavirus 34 corona positive patient increase and one lady death