10 th Result : जालना जिल्ह्याचा निकाल ९४ टक्के; यंदाही मुलीच अव्वलस्थानी

jalna result.jpg
jalna result.jpg

जालना  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी ( ता. २९ ) दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यात जालना जिल्ह्याचा निकाल ९४ टक्के इतका लागला आहे. जाफराबाद तालुक्याचा सर्वाधिक निकाल आहे. जिल्‍ह्यात यंदा मुलींचीच बाजी राहिली. 

जिल्ह्यातील विविध व्यवस्थापन व माध्यमाच्या ३९५ माध्यमिक शाळा आहेत.कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आलेला होता.लॉकडाउन संचारबंदी काळात शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणी करीत निकाल तयार केला. जिल्हयाचा दहावीचा सरासरी निकाल ९४.४ टक्के इतका लागला आहे. निकालात नेहमी प्रमाणेच मुलींनीच बाजी मारली आहे.जिल्हयात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९१.८८ टक्के इतके असून मुलींची टक्केवारी ही ९६.७१ टक्के इतका लागला आहे.

जिल्ह्यातील मराठी, हिंदी,उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळेतील ३० हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दरवर्षी पेक्षा यंदा दोन महिने उशीराने लागला आहे. जिल्हयात पुरवणी परीक्षेत १ हजार ९८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात १ हजार ५९६ मुले तर ३९३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.पुरवणी परीक्षेचा जिल्हयाचा निकाल ७६.२९ टक्के इतका लागला आहे. 

तालुका निकालाची टक्केवारी 

  • जालना ९४.६२ 
  • बदनापूर ९३.५४ 
  • अंबड ९२.१७ 
  • परतूर ९०.८० 
  • घनसावंगी ९२.५८ 
  • मंठा ९०.७५ 
  • भोकरदन ९६.५० 
  • जाफराबाद ९७.४३

Edited by pratap awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com