CORONA UPDATE : धक्कादायक..! जालन्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

महेश गायकवाड
मंगळवार, 30 जून 2020

जालना शहरात रोज वाढत असलेल्या रुग्णांमुळे चिंता वाढत असताना मंगळवारी (ता.३०) शहरातील दोन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळीचा आकडा पंधरा वर गेला आहे.

जालना : जालना शहरात रोज वाढत असलेल्या रुग्णांमुळे चिंता वाढत असताना मंगळवारी (ता.३०) शहरातील दोन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळीचा आकडा पंधरा वर गेला आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

मंगळवारी सकाळी ३१ रूग्णांची भर पडल्यामुळे एकुण बाधितांचा आकडा ५५४ वर पोचला आहे. यातील २७ जण हे शहरातील विविध भागातील असल्याने नागरिकांची चिंता वाढली असताना दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

मृत्यू झालेले दोन्ही रुग्ण जालना शहरातील असून यातील एक शहरातील मंठा चौफुली परिसरातील तर दुसरा नरिमन नगर येथील आहे. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड, डॉ.संजय जगताप यांच्यासह सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोन्ही रूग्णांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांचा सकाळी मृत्यू झाला.

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली  

सलग दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा पंधरा झाला आहे. दिवसभरात वाढलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा ५५४ झाली असून त्यापैकी ३३६ रुग्ण बरे झाले आहे. सध्या रुग्णालयात ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna district two corona death