जालन्याच्या उद्योजकाचा अपहरणाचा प्रयत्न, पोलिसांनी पाच जणांना घेतले ताब्यात

Jalna Industrialist Kidnapping News
Jalna Industrialist Kidnapping News

जालना : उद्योजक राजेश सोनी यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (ता.२८) पकडले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, एक कार ही जप्त केली आहे. उद्योजक राजेश सोनी यांचे ता.२३ फेब्रुवारी रोजी दुपारी अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणी संशयितांची माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक शाखेने या प्रकरणी परतूर येथून संशयित आरोपी राजेंद्र बाबासाहेब राऊत ऊर्फ राजन बाबूराव मुजमुले, विशाल संजय जोगदंड (वय २०) भागवत ऊर्फ संभ्या बालाजी राऊत (वय २०), पांडुरंग ऊर्फ ओम बबन वैद्य (वय २४, तिघे रा. महेंद्र शोरूमच्या पाठीमागे वैद्यचा मळा, जालना) व मोहम्मद इरफान मलीक (रा. पडेगाव, औरंगाबाद) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता संशयित राजेंद्र राऊत ऊर्फ राजन बाबूराव मुजमुले याच्यावर कर्ज होते. त्यामुळे त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने उद्योजक राजेश सोनी यांच्या अपहरणाचा कट रचला.

मात्र, तो फसला. उद्योजक श्री. सोनी यांचे अपहरण करून एक ते दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचा कट या पाच संशयितांनी रचला होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी या पाच संशयितांकडून दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतूस, पुणे येथून चोरून आणलेली एक कार ही जप्त केली आहे.

दरम्यान पांडुरंग ऊर्फ ओम बबन वैद्य याच्याविरोधात टेंभुर्णी येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर राजेंद्र ऊर्फ राजन याच्या विरोधात जालना व इतर जिल्ह्यात जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बावीस्कर, देवीदास भोजने, विलास चेके, संदीप मांटे, सूरज साठे यांनी केली.

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com