जनता कर्फ्यूतही दवादारूचा इंतजाम

जालना : जनता कर्फ्यूतही सुरु असलेले वाईन शॉप. 
जालना : जनता कर्फ्यूतही सुरु असलेले वाईन शॉप. 

जालना - व्यापारी महासंघाने शुक्रवारपासून (ता.१९) पुकारलेल्या जनता कर्फ्यूमध्ये शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली. अर्थात मेडिकल, रूग्णालये, कृषी संबंधित दुकानांप्रमाणे शहरातील मद्यालये म्हणजेच वाईन शॉपी सुरू होत्या.  या जनता कर्फ्यूबाबत मद्यविक्रेते आणि मद्यप्रेमी फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले. 

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी व्यापारी महासंघाने ता.१९ ते ता. २१ जून हे तीन दिवस मार्केट बंद ठेवत जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला होता. या जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत जालना शहरातील व्यापारी, दुकानदारांनी शुक्रवारी दुकाने बंद ठेवऊन कडकडीत जनता कर्फ्यूचे पालन केले. दरम्यान मार्केट बंद असताना देखील दुचाकीस्वारांची रेलचेल सुरूच होती. 

जालना जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या ही ३५० वर जाऊन ठेपली आहे. तर आतापर्यंत दहा जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहेत. त्यामुळे व्यापारी महासंघाने जालना शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व्यापारी महासंघाने स्‍वंयस्फुतींने तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी मेडिकल, रूग्णालये, कृषी संबधित दुकाने सुरू ठेवण्यात आले होते. सोबतच वाईन शॉपीही सुरु असल्याने मद्यप्रेमींची गर्दीही होती. पालिकेच्या वतीने तीन दिवसांच्या काळात शहरातील बाजारपेठांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com