टरबूज खायला गेलेल्या म्हशीला 'करंट', जागीच मृत्यू

भास्कर सोळंके
Friday, 8 January 2021

गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या आणि उजवा कालवा परिसरातील बहुतांशी  शेतकऱ्यांनी टरबूज/खरबूज फळबाग शेती केली आहे

जातेगाव (जि. बीड): गेवराई तालुक्यातील सेलू शिवारातील टरबूज पिकाचा वन्य प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी एका शेतकऱ्याने करंट सोडला होता. हा करंट म्हशीच्या जीवावर बेतला आहे. करंट लागून म्हैस प्रकार गुरुवारी पहाटे घडला. 

गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या आणि उजवा कालवा परिसरातील बहुतांशी  शेतकऱ्यांनी टरबूज/खरबूज फळबाग शेती केली आहे. मात्र, या भागात रानडूक्कर, हरिण अशा वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. वन्यप्राणी रब्बी हंगामातील गहू, हरभरा शिवाय फळबागात खरबूज, टरबूज या पिकांची नासाडी करत आहेत.

मराठवाड्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी रिमझिम पाऊस, पिकांना फटका 

वन्यप्राण्यांकडून बचाव करण्यासाठी शेतकरी साड्यांची झालर, बुजगावणे करुन रात्री शेतात मुक्कामी राहतात. दरम्यान, काही शेतकरी विजेचा करंट सोडत असून यामुळे शेजारील शेतकरी यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. अशीच एक घटना गुरुवारी (ता सात)पहाटे सेलू शिवारात एका शेतकऱ्याने टरबूज बचाव करण्यासाठी करंट सोडण्यात आला होता.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

शेजारच्या जगन्नाथ जगताप यांची सत्तर हजार किमंतीची म्हैश सुटल्यावर या लावलेल्या करंटची बळी ठरली आहे. म्हैशीच्या जीवावर बेतलेला करंट शेतकरी यांच्या जीवाला बेतण्याची शक्यता वाढली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jategaon Beed news Buffalo eating turbooz dies electicity current