बेरोजगारांसाठी नोकरीची संधी : बीडमध्ये रोजगार मेळावा 

दत्ता देशमुख
Saturday, 5 December 2020

१२ व १३ डिसेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती 

बीड : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्तालयाच्या पुढाकाराने १२ व १३ डिसेंबरला ऑनलाईन राज्यस्तरीय पंडीत दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामधील मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स (Skype Whatsapp etc) व्दारे घेण्यात येणार आहे. मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आली आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यासाठी वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या व्हिडीओकॉन्फरन्स (Skype,Whatsappetc.) व्दारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्राँईड मोबाईलधारकानी प्लेस्टोअर मधून Mahaswayam अॅप मोफत डाऊनलोड करुन नोंदणी करावी. तसेच लॉगइन करुन शैक्षणिक पात्रतेनूसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अप्लाय करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

edit-pratap awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job Opportunities for Unemployed Employment Fair Beed