
कळंबच्या विलगीकरण केंद्रात सूविधांचा अभाव
खासदार, आमदार यांनी भेट देऊन साधला लोकांशी संवाद
कळंब : कोरोनाबाधितांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी शहरातील विद्याभवन हायस्कूलच्या वसतिगृहाला विलगीकरण म्हणून म्हणून कार्यान्वित केले आहे. मात्र, सेंटरमध्ये सेवासुविधा अभावी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपर्कातील व्यक्तींना मरण यातना भोगाव्या लागत असून अशुद्ध पाणी पिण्यास मिळत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत थेट रुग्णांनी व्हिडीओ, फोटो काढून व्हायरल केले असून सेंटर मधील नागरिकांना तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
प्रशासनाने ढोकी रस्त्यावरील विद्याभवन हायस्कुलमधील वस्तीगृहांमध्ये संपर्कातील व्यक्तीना विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. सध्या सेंटर मध्ये संपर्कातील मोठ्या प्रमाणात व्यक्तीना दाखल करण्यात आले आहे. ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना तात्काळ तांदुळवाडी रस्त्यावरील शासकीय औधोगीक प्रशिक्षण केंद्रामधील कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. विलगीकरण कक्षातील लोकांना सेवा-सुविधा उपचार, स्वच्छता याची खबरदारी महसूल विभाग, आरोग्य विभाग यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे. विलगीकरण कक्षातील लोकांचे जेवण, पाणी,स्वच्छता बाबतीत प्रचंड हेळसांड होत आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
याबाबत अनेकांनी थेट व्हिडीओ, फोटो काढून व्हायरल करत खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. लोकांना दिले जाणारे जेवण भाज्या आणि चपाती कच्च्या दिले जातात. प्लास्टिक पिशवीमधून भाज्या दिल्या जात असल्याने भाज्यांचा वास येत आहे. अशुद्ध पाणी पिण्यास दिले जात असल्याने आरोग्य धोक्यात येत असल्याचे स्वतः कक्षातील लोकांनी थेट खासदार व आमदार यांच्याकडे तक्रारी केल्या.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
या प्रकारानंतर आमदार कैलास पाटील यांनी विलगीकरण कक्षाला भेट दिली. शुद्ध पाणी, दर्जात्मक जेवण द्यावे यापुढे रुग्णांच्या उपचाराबाबत हयगय केल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा शब्दात प्रशासनाची कानउघाडणी केली. यावेळी तहसीलदार अस्लम जमादार, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, नगरसेवक सतीश टोणगे, शहरप्रमुख प्रदीप मेटे, संतोष खोचरे, युवा सेनेचे नितीन लांडगे, अजित गुरव उपस्थित होते.
Edited By Pratap Awachar