esakal | कळंब : कोरोनाचा कहर सुरूच, आज २८ बाधित, दत्तनगरातील एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

कळंब तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. मागच्या पंधरा दिवसापासून रुग्णसंख्येतील वाढ थांबण्याचे चिन्ह दिसून येत नाही. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा असलेला वेग कायम असून गुरुवारी (२६) तर शुक्रवारी (२८) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

कळंब : कोरोनाचा कहर सुरूच, आज २८ बाधित, दत्तनगरातील एकाचा मृत्यू

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद) : मागच्या पंधरा दिवसापासून धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्याची संख्या दोन झाली आहे. शुक्रवारी (ता.७) शहरातील दत्तनगर भागातील ४८ वर्षे व्यक्तींची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. आज २८ रुग्णांची भर पडली आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या जास्त असल्याने ही ग्रामीण भागासाठी धोक्याची घंटा आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र येथील लॅबकडून कळंब तालुक्यातील २८ पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 

कळंब तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. मागच्या पंधरा दिवसापासून रुग्णसंख्येतील वाढ थांबण्याचे चिन्ह दिसून येत नाही. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा असलेला वेग कायम असून गुरुवारी (२६) तर शुक्रवारी (२८) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश
यात कळंब तालुक्यातील रत्नापुर १७, इटकुर, कण्हेरवाडी, भाटशीरपुरा, दहिफळ, येरमळा प्रत्येकी एक, मस्सा (ख) सहा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे आढळून आले. उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी प्रतिबंधित झोन तयार केले आहेत.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

ग्रामीण भागासाठी धोक्याची घंटा 
ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव दिसून येत असल्याने ही ग्रामीण भागासाठी धोक्याची घंटा आहे.कोठून कशी रुग्ण संख्येत वाढ होत आहे .यामुळे प्रशासन कोड्यात पडले आहे.सात दिवसासाठी शहरात जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढणे अपेक्षित नसतानाही वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. शहरात कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. यापूर्वी सराफ व्यापारयांचा व आज शहरातील दत्तनगर भागातील ४८ वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

संपादन-प्रताप अवचार

loading image