esakal | कळंबच्या स्टेट बॅंकेचा संसर्ग तुटेना, पुन्हा बॅंकेला कुलूप, ग्राहकत्रस्त  
sakal

बोलून बातमी शोधा

Kalanb state bank.jpg

कळंब स्टेट बॅंकेतील व्यवहार अद्यापही सुरळीत झाले नाहीत. येथील बॅेकेतील कर्मचार्यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे बॅंक पुन्हा बंद करण्यात आली  आहे. 

कळंबच्या स्टेट बॅंकेचा संसर्ग तुटेना, पुन्हा बॅंकेला कुलूप, ग्राहकत्रस्त  

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद) : शहरातील स्टेट बॅंकेचे १० कर्मचारी, अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने १४ ऑक्टोंबर पासून बॅंक बंद आहे. ई-सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर बॅंकेच्या वरिष्ठ व्यवस्थापणाकडून दखल घेत उस्मानाबाद, भूम आणि बीड येथील कर्मचारी पाठविण्यात आले. त्यानंतर बॅंकींग व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण मंगळवार (ता.२०) बॅंकेतील आणखी दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तब्बल आठ दिवसांनी उघडलेली बॅंकेची दारे पुन्हा बंद करावी लागली आहेत. त्यामुळे शहरातील आर्थिक घडी विस्कटली असून ऐन सणासुदीच्या काळात अनेक ग्राहकांना रिकाम्या हातानी परतावे लागत आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शहरातील स्टेट बॅंकेत सर्वात जास्त आर्थिक व्यवहार होत आहेत. सर्वच शासकीय कार्यालयाची याच बॅंकेत खाती असून शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे मासिक वेतन देखील या बेंकेमधून वाटप करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात स्टेट बॅंकेच्या व्यवस्थानकडून सॅनिटाझर, सामाजिक अंतर ठेवणे यासबंधीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले नसल्याने बॅंक कोरोना संसर्गाच्या आजारात बुडाली आहे. शासनाच्या नियमाचे पालन न केल्याने खातेदाराकडून संसर्गाचा प्रसार झाल्याची शक्यता आहे. १४ अक्टोंबर रोजी बॅंकेचे कर्मचारी अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह उघडकीस आले. त्यामुळे बॅंकेचे सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले. सकाळ ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बॅंकेच्या वरिष्ठ व्यवस्थापणाकडून भूम, उस्मानाबाद आणि बीड येथील सहा कर्मचारी बोलविण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बॅंकेतील सिस्टीम अपडेट करण्यात दोन दिवस उलटले. बॅंकेतील मुख्य ट्रेजरी ला बॅंकेतील कर्मचारी यांचा अंगटा लागल्याशिवाय ओपन होत नसल्याचे दिसून आले. यानंतर बॅंकेच्या संबंधितांनी वरच्या पातळीवरून बॅंकेची सिस्टीम अपडेट करून घेण्यात आली. पण पुन्हा दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे बॅंक अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आर्थिक व्यवहार रखडले 
सध्या सोयाबीन खरेदी विक्रीचे व्यवहार तेजीत आहेत. मोठं मोठ्या व्यपाऱ्याचे आर्थिक व्यवहार याच बॅंकेतून होतात. चेक क्लेरन्स, खात्यावरील पैसे काढणे, ठेवणे, इतर बॅंकेतील चेक अमाउंट ट्रान्स्फर करणे आधी आर्थिक व्यवहार थांबले आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)