esakal | कळंब तालुक्यातील ऊस शेतकरी आर्थिक संकटात, या दोन साखर कारखाण्याकडून बील मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

us shetkari.jpg

कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तालुक्यातील शेकडो शेतकऱ्याची ऊस बिले दोन साखर कारखान्यांकडून जमा करण्यास दिरंगाई करण्यात येत असून या कारखान्यांनी ऊस बिले थकीत ठेवली आहेत. कोरोनाच्या संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. या कारखान्याने शेतकऱ्याचे करोडो रूपये थकविले आहेत.

कळंब तालुक्यातील ऊस शेतकरी आर्थिक संकटात, या दोन साखर कारखाण्याकडून बील मिळेना

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तालुक्यातील शेकडो शेतकऱ्याची ऊस बिले दोन साखर कारखान्यांकडून जमा करण्यास दिरंगाई करण्यात येत असून या दोन कारखान्यांनी ऊस बिले थकीत ठेवली आहेत. कोरोनाच्या संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. या कारखान्याने शेतकऱ्याचे करोडो रूपये थकविले आहेत.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

तालुक्यात गेल्यावर्षीच्या दुष्काळाच्या दाहकतेमुळे उसाची लागवड कमी प्रमाणात करण्यात आली होती. पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांकडे ऊसाचे क्षेत्र पहावयास मिळत होते. उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे तालुक्यातील हावरगाव येथील डीडीएन शुगर-दोन व रांजणी येथील एनसाई या कारखान्याचे बॉयलर पेटविण्यात आले नव्हते. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

चोराखळी येथील धाराशिव आणि वाशी येथील शिवशक्ती-भैरवनाथ या दोन साखर कारखान्याचे २०१९ मध्ये गाळप सुरू झाले होते. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱयांनी या दोन साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

शेतकऱ्यांनी ऊस गाळपास दिल्यानंतर १४ दिवसाच्या आत ऊस बिले जमा करावीत अशी सूचना शासनाकडून करण्यात आली आहे. तरीही ऊस बिले देण्यास टाळाटाळ होत असून प्रत्येक वर्षी शेतकऱयांना ऊस बिले देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ऊस बिले मिळविण्यासाठी शेतकरी व शेतकरी संघटनांना आंदोलने करावी लागतात. यावेळी मात्र कोरोनाच्या टाळेबंदीमुळे शेतकऱयांना आंदोलने करता आली नाहीत. टाळेबंदी चे कारण पुढे करत शेकडो शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची उसबिले या कारखान्यांनी थकीत ठेवली आहेत. नोव्हेंबर,डिसेंबर महिन्यात गाळप केलेल्या उसाची काही कारखाण्याकडे एफआरपी प्रमाणे रक्कम थकीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. साखर कारखान्याचा गाळप हंगाम मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपला आहे. तरीही ऊस बिले देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेतकरी मोठ्या अर्थीक संकटात सापडले आहेत.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

 शेतकऱ्याचा नेत्यांना फुकट कळवळा

बहुतांश कारखाने हे नेते मंडळींचे आहेत. सहा महिन्यांपासून शेकडो शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची ऊसबिले थकीत आहेत. काही नेतेमंडळी शेतकऱ्याचे नाव घेऊन फुकट कळवळा दाखवितात. मग थकीत उसबीलासाठी का आवाज उठवीत नाहीत असा सवाल उस उत्पादक शेतकरी करीत आहेत.