दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत, कऴंब-उमरग्याला 27 कोटींचे अनुदान

E sakal.png
E sakal.png

कळंब/उमरगा (उस्मानाबाद) : कळंब तालुक्यातील ७१ गावात अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्यात आले असून शेतकऱयाना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने तहसील कार्यलयाने १२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. पैकी १५ हजार ९२८ शेतकऱ्यासाठी ६ कोटी रुपयांचा पहिल्या हप्त्याची रक्कम तहसील कार्यलयाच्या बॅंक खात्यावर जमा झाली असून दिवळीपूर्वी शेतकऱयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्याच्या याद्या बॅंकेकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार मंजुषा लटपटे यांनी दिली आहे.

कळंब तालूक्यातील काही महसूल मंडळात जून ते सप्टेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टीचा पाऊस झाला होता. त्याचा फटका तालूक्यातील ७२ गावातील १५ हजार ९८० शेतकऱयांचे सोयाबीन पाण्यात गेले होते. त्यामुळे शेतकऱयांना प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला होता. शासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.यामध्ये मनुष्य हानी जखमी तसेच नैसर्गिक आपत्ती पूर्णतः नुकसान झालेल्या घरांची घरगुती भांडी व वस्तूसाठी च्या अर्थसाह्य याचा समावेश करण्यात आला असून तहसील किंवा कृषी कार्यल्याकडे अर्ज करण्याचे सांगण्यात आले होते.

यामध्ये तालुक्यातील नदी काठच्या शेतीपिकला जबर फटका बसला आहे.सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे पंचनाम्यात उघड झाले आहे.आमदार कैलास घाडगे-पाटील,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ,तहसीलदार मंजुषा लटपटे,तालुका कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली होती. तहसीलदार यांनी नुकसान झालेल्या स्पॉट पंचनामे व दाखल अर्जानुसार कळंब तालुक्यातील १५ हजार ९८० शेतकऱ्याचे नुकसान झाले असून १२ कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला होता. शासनाने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्यासाठी पहिला हप्ता म्हणून ६ कोटी रुपये तहसील कार्यलयाकडे जमा झाले आहेत.दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात कारवाही करण्यासाठी तहसीलदार मंजुषा लटपटे यांनी संबधित बॅंकेचे मॅनेजर यांची बेठक घेऊन तात्काळ नुकसानीचे अर्थसाह्य शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दिवाळी पूर्वी रक्कम शेतकऱ्याना मिळेल आशा दृष्टीने कारवाही सुरू असल्याचे तहसीलदार श्रीमती लटपटे यांनी सांगितले.

उमरगा तालूक्यासाठी २२ कोटी ३४ लाख, ६० हजार रुपये अनुदानाची रक्कम प्राप्त 

उमरगा : महसूलच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम करण्याची प्रक्रिया सुरू अतिवृष्टीने खरिप पिकासह शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसाठी मंगळवारी (ता.१०) २२ कोटी ३४ लाख, ६० हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. दरम्यान एकुण अनुदान रक्कमेच्या पन्नास टक्के अनुदानाची रक्कम पहिल्या टप्प्यात प्राप्त झाल्याने सर्वच लाभार्थीनी त्यांना मिळणाऱ्या एकूण अनुदानापैकी पन्नास टक्के रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावरच अनुदानाची रक्कम जमा केली आहे ; तरीही महसूल प्रशासनाने लाभार्थी याद्यांचे पूर्वनियोजन केल्याने गुरुवारी (ता.१२) आयसीसीआय बँकेत रक्कम जमा करण्यात आली आहे. 

अतिवृष्टीमुळे शेतजमिनीबरोबरच पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने दोन हेक्टर मर्यादेपर्यत जिरायत व बागायत शेतीला दहा हजार तर फळबाग क्षेत्रासाठी पंचवीस हजाराचे अनुदान जाहिर केले होते. तालूक्यात ४४ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याने एकुण ४४ कोटी ५६ लाख, ४५ हजार रुपये अनुदान रक्कमेची आवश्यकता आहे. मात्र पहिल्या टप्प्यात तहसील कार्यालयाकडे निम्मीच रक्कम प्राप्त झाली आहे, त्या रक्कमेचा वितरण कशा पद्धतीने करायचे याबाबतचा निर्णय झाला आणि प्राप्त झालेली रक्कम प्रत्येक लाभार्थींना त्यांना मिळणाऱ्या एकुण रक्कमेच्या निम्मी रक्कम वर्ग करण्याचा निर्णय झाला. गुरुवारी ५० हजार ४९० लाभार्थ्यांची यादी व २२ कोटी ३४ लाख, ६० हजार सातशे रुपयाचा धनादेश रक्कमे आयसीसीआय बँकेत जमा करण्यात आला आहे. शुक्रवारी ( ता. १३ ) लाभार्थीच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com