esakal | काळेवाडी पाझर तलावाचा भराव खचला, युद्धपातळीवर काम सुरु !
sakal

बोलून बातमी शोधा

kalewadi talav.jpg

परंडा तालुक्यातील काळेवाडी येथील पाझर तलाव मंगळवारपासून धोकादायक झाला आहे. तलावाचा भराव खचत असून त्याला समांतर भेगा पडल्याचे समोर आले आहे. 

काळेवाडी पाझर तलावाचा भराव खचला, युद्धपातळीवर काम सुरु !

sakal_logo
By
सयाजी शेऴके

परांडा (उस्मानाबाद) : परंडा तालुक्यातील काळेवाडी येथील पाझर तलाव मंगळवारपासून धोकादायक झाला आहे. तलावाचा भराव खचत असून त्याला समांतर भेगा पडल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने लागलीच उपाय योजना सुरू केल्या आहेत. साधारण दोनशे मीटर लांबीमध्ये भराव खचत आहे. सांडव्या मध्ये पोकलेन मशीनच्या साह्याने सांडव्याला तोडून पाणी पातळी कमी करण्यात येत आहे. परंतु खडक असल्याने खोल चर जात नाही. त्यामुळे ब्रेकर लावून खोल चर करण्यात येत आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

त्या व्यतिरिक्त पाईप टाकून पाणी कमी करण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. तसेच जेसबी व ट्रॅक्टरच्या साह्याने खचलेल्या ठिकाणी भराव टाकण्यात येत आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता दोनशे सघमी आहे. सध्या दोन फूट पाणी पातळी कमी करण्यात आली. अजून ४ फूट पाणी पातळी कमी झाल्यास धोका कमी होईल. तसेच भरावाच्या खालच्या बाजूस वेगळे पोकलेंन व चार हायवा ट्रकच्या साह्याने बर्म टाकण्याचे काम सुरू करत आहे.  याठिकाणी कार्यकारी अभियंता,  तहसीलदार, बीडीओ उपअभियंता यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात आहे. या तलावातील पाणी जाण्याचा मार्ग पूर्ण झाल्यास तलाव फुटण्याचा धोका कमी होणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणेकडून युद्धपातळीवर काम केले जात आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)